धक्कादायक! रिक्षाच्या भाड्यासाठी पैसे नव्हते, पुण्यात परदेशी मुलीवर बलात्काराचा प्रसंग

मुलगी रिक्षात बसली मात्र रिक्षाचे भाडे देण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. माझ्याकडे रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नाहीत मी तुम्हाला पैसे नंतर दिले तर चालतील का अशी विनंती मुलीने केली

Rickshaw driver rape foreign minor girl in Hadapsar Pune
धक्कादायक! रिक्षाच्या भाड्यासाठी पैसे नव्हते, पुण्यात परदेशी मुलीवर बलात्काराचा प्रसंग

पुण्यात (Pune)  परदेशी अल्पवयीन मुलीवर ( foreign minor girl)  रिक्षा चालकाकडून (Rickshaw driver)  बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षाचे भाडे देण्यासाठी या अल्पवयीन मुलीकडे पैसे नसल्याने नराधम रिक्षा चालकाने तिच्यावर बलात्कार केला असा आरोप मुलीने केला आहे. पुण्यातील हडपसर येथील रेसकोर्स येथील ही घटना असून मुलीच्या तक्रारीनंतर  त्या नराधम रिक्षा चालकाला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी रिक्षा चालकासह मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहेत. या घटनेनंतर पुणे हादरुन गेले आहे. पुण्यात खरंच मुली सुरक्षीत आहेत असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडल?

पुण्यातील हडपसर रेसकोर्स येथे ५ जानेवारी रोजी ही घटना घटली. पीडित मुलगी नेपाळची रहिवाशी असून कामानिमित्त ती पुण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ती पुण्यात अनेक ठिकाणी फिरत होती. ५ जानेवारीला ती कामानिमित्त हडपसर येथून पुण्याच्या मध्यवर्ती असलेल्या बुधवार पेठ येथे येण्यासाठी निघाली होती. मुलगी रिक्षात बसली मात्र रिक्षाचे भाडे देण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. माझ्याकडे रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नाहीत मी तुम्हाला पैसे नंतर दिले तर चालतील का अशी विनंती मुलीने केली मात्र नराधम रिक्षा चालकाने मुलीकडून रिक्षाचे भाडे वसूल करण्यासाठी तिच्या बलात्कार केला.

परदेशी अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या सर्व प्रकाराचा तिने पुणे पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सध्या पोलीस करत आहेत. रिक्षा चालकासोबत आणखी तिघांनी मुलीवर अत्याचार केल्याचे देखील मुलीने सांगितले. त्यामुळे रिक्षा चालकासोबत त्याच्या तीन साथीदारांना देखील पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – Bulli bai Case | या प्रकरणाची पाळंमुळं शोधून काढू, मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळेंना विश्वास