पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचा आजपासून बेमुदत बंद

पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा चालक आक्रमक झाले आहे. पुण्यात 28 नोव्हेंबरपासून ऑटो रिक्षाचालकांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. बेकायदा बाईक टॅक्सी बंद व्हावी म्हणून रिक्षाचालकांनी हा संप पुकारला असून, रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत.

Rikshaw, Taxi Fare general public will now have to pay more for rickshaws and taxis

पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा चालक आक्रमक झाले आहे. पुण्यात 28 नोव्हेंबरपासून ऑटो रिक्षाचालकांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. बेकायदा बाईक टॅक्सी बंद व्हावी म्हणून रिक्षाचालकांनी हा संप पुकारला असून, रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. रिक्षा बंदमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक सहभागी होणार आहेत. परिणामी प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. (rickshaw strike indefinite strike of rickshaw drivers against bike taxi from november 28)

पुण्यात एकूण 12 रिक्षाचालक संघटना आहेत. या रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या सगळ्या संघटना बाईक टॅक्सी बंद विरोधात एकत्र आल्या आहेत आणि त्यांनी संप पुकारण्याची घोषणा केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बाईक टॅक्सी मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. याचा फटका इतर रिक्षाचालकांना बसतो. या बाईक टॅक्सीमुळे भाडे मिळणे कठीण होते. याचा परिणाम त्यांच्या कमाईवर होतो.

दरम्यान, बाईक टॅक्सी बंद करण्याची मागणी त्यांनी यापूर्वीदेखील केली होती. काही प्रमाणात आंदोलनदेखील केलं होतं. मात्र त्यांची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. संपात एकूण 12 रिक्षाचालक संघटना सहभागी होणार आहेत.

रिक्षा संघटनेने आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून रिक्षा चालकांच्या हितासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. ज्या संघटना अजूनही आंदोलनामध्ये सहभागी झाल्या नाहीत, त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेने केलं आहे.

संपात 50 ते 60 हजार रिक्षाचालक सहभागी होणार आहे. संप 28 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे. या संपामध्ये जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने इतर रिक्षाचालकांना केलं आहे.


हेही वाचा – ‘मरे’च्या दादर रेल्वे स्थानकातील गर्दीचे होणार विभाजन; प्रवाशांना मोठा दिलासा