घरताज्या घडामोडीराज्यात वाढतंय बालमृत्यूचे प्रमाण, वर्षभरात २ हजाराहून अधिक चिमुकल्यांचा मृत्यू

राज्यात वाढतंय बालमृत्यूचे प्रमाण, वर्षभरात २ हजाराहून अधिक चिमुकल्यांचा मृत्यू

Subscribe

वर्षभरात नागपूरात ८८६ बालमृत्यू

राज्यात होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने नवसंजीवनी योजना, जननी सुरक्षा यासारख्या अनेक योजना राबवल्या आहेत. मात्र राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात गेल्या वर्षाभरात झालेल्या बालमृत्यूची संख्या २ हजार ४२६ इतकी आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने नवनवीन योजना राबवून कोट्यावधीचा खर्च करुनही राज्यातील बालमृत्यू रोखण्यात यश येत आलेली नाही. २०२०-२१ या काळात राज्यातील सहा जिल्ह्यांत शून्य ते एक वर्ष वयोगटातील २ हजार ४२६ बालमृत्यू झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक बालमृत्यूचे प्रमाण आहे. गेल्या वर्षभरात नागपूरात ८८६ बालमृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या काळात बालमृत्यूचे प्रमाण हे पूर्व विदर्भात सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. (Rising child mortality rate in Maharashtra, more than 2,426 Child deaths per year)

राज्यात सध्या बालमृत्यू कमी करण्यासाठी नवसंजीवनी योजना, जननी सुरक्षा योजना, जेएसएसके योजना राबवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे १०८ रुग्णवाहिका सेवा, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरण सेवा, एनएचएम अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट सेवा व मानव विकास कार्यक्रम अशा अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालमृत्यूच्या योजनेत काम करणारे डॉक्टर्स, कर्मचारी,परिचारीका कोरोना काळात कोविड केअर सेंटर्स, डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल्स त्याचप्रमाणे लसीकरण केंद्र, चाचणी केंद्रांत आपली ड्यूटी करत आहेत. त्यामुळे बालमृत्यूच्या संदर्भातील योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मागच्या पाच वर्षात राज्यातील बालमृत्यूंची संख्या वाढल्याचे चित्र समोर आले आहे. २०१४ -१५ मध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात १ हजार ६६ बालमृत्यू झाले होते. तर २०२०-२१मध्ये हा आकडा आता २ हजार ४२६ वर पोहचला आहे. शून्य ते एक या वयोगटातील नागपूरात ८८६ बालमृत्यूंची नोंद झालीय. भंडारा जिल्ह्यात ४७४ , नागपूरात ८८६ तर गडचिरोलीत ३७६, गोंदिया जिल्ह्यात २७७ आणि वर्धा जिल्ह्यात १६५ बालमृत्यूंची नोंद झाली आहे.


हेही वाचा – ईडीकडून पुन्हा समन्स; देशमुखांकडून वय, आजारपणाचं कारण पुढे, जबाब व्हिसीद्वारे घेण्याची विनंती

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -