घरमहाराष्ट्रकोरोनाचा औरंगाबादमधील पर्यटन व्यवसायाला फटका

कोरोनाचा औरंगाबादमधील पर्यटन व्यवसायाला फटका

Subscribe

शहरातील हॉटेल्समधील ८० टक्के खोल्या धुळखात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाटयाने वाढत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येचा औरंगाबादमधील पर्यटन व्यवसायाला फटका बसला आहे. कोरोनाच्या भीतीने औरंगाबाद जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्याप्रमाणात घटली आहे. याचा थेट परिणाम शहरातील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४०० हॉटेल्समधील ८० टक्के खोल्या धुळखात पडल्या आहेत. मार्च महिन्यात औरंगाबादमध्ये मोठ्याप्रमाणात पर्यटन येत असतात. औरंगाबादमधील प्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेणीला भेट देण्यास विदेशी पर्यटकांची पसंती असते. मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या भीतीने अनके विदेशी पर्यटकांनी यात्रा रद्द केली. सध्या औरंगाबादमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २०० पार गेली आहे. याचा पहिला फटका पर्यटन व्यवसायाला बसत आहे. रुग्णसंख्या अशीच वाढली तर महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केला जाऊ शकतो. या शक्यतेमुळे अनेक पर्यटक प्रवास करणे टाळतात. कारण लॉकडाऊन झाले तर पर्यटनासाठी गेलो त्या शहरात अडकून बसू या भीतीने अनेक पर्यटक येणे टाळत आहेत. त्यामुळे औरंगाबाद सारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असलेल्या जिल्ह्यात पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे.

औरंगाबाद शहरात ४०० लहान मोठे हॉटेल्स आहेत. या हॉटेल्समध्ये जवळपास १२ ते १५ हजार खोल्या आहेत. मात्र यांतील ८० टक्के खोल्या ह्या पर्यटकांअभावी धुळखात पडल्या आहेत. जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून हॉटेलिंग व्यवसायाला पुन्हा सुरुवात झाली. यानंतर कोरोना आटोक्यात येत असताच जानेवारीपर्यंत पुन्हा हॉटेल्स बुकिंग वाढले. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांचा आकडा पून्हा वाढू लागला. त्यामुळे हॉटेल व्यवसाय परत बंद होण्याच्या मार्गावर आले. याचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला. हॉटेल व्यवसायिकांचे आर्थिक गाडे परत रुळावर येत असतानाच पुन्हा थांबले. राज्यभरातून पर्यटनातून मिळणारा ५०० कोटींचा महसूल बुडाला. अनेक हॉटेल्स व्यवसायिकांवर हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली. मात्र पुन्हा लॉकडाऊन झाले तर यातून सावरलेल्या हॉटेल व्यवसायिकांचे काय होणार ? असा यक्ष प्रश्न अनेक हॉटेल व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे चौकातले भाषण- देवेंद्र फडणवीस

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -