रितेश व जेनेलिया देशमुख नाशकात; बाल येशूचं घेतलं दर्शन

फादर ऑगस्टीन यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करत केलं प्रसाद वाटप

Ritesh in Nashik

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुजा यांनी आज सहकुटुंब नाशिकमध्ये येत नाशिक-पुणे रोडवरील प्रसिद्ध बाल येशूचं दर्शन घेतलं. फादर ऑगस्टीन यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करत प्रसाद वाटप केलं.

रितेश देशमुखसह जेनेलिया आणि तिची आई जेनीती व वडील निल हेदेखील नाशिकमध्ये आले होते. बाल येशू मंदिरात जाऊन त्यांनी प्रार्थना करत आशिर्वाद घेतलं. नाशिकमधील बाल येशू मंदिर संपूर्ण देशभरात एकमेव बालस्वरुपातील येशूचं मंदिर असल्याचं मानलं जातं. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. दर्शनासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. मात्र, कोरोना संसर्गाच्या संकटामुळे यंदा हा यात्रोत्सव रद्द करण्यात आला.