घरउत्तर महाराष्ट्रचक्क! घोड्याचा होणार विधीवत दशक्रिया विधी; कीर्तनाचेही आयोजन

चक्क! घोड्याचा होणार विधीवत दशक्रिया विधी; कीर्तनाचेही आयोजन

Subscribe

नाशिक : शेतकर्‍याच्या जीवनात त्याच्या पाळीव प्राण्याचे महत्व खूप मोलाचे असते. दारापुढे बैलजोड, गाय नाही तो शेतकरीच नाही असा समज ग्रामीण भागात असतो. गाय, बैल यांच्यासोबतच कुत्रे, बकरी, कोंबडी, घोडा अश्याही पाळीव प्राण्यांचा समावेश शेतकर्‍याच्या जनावरांमध्ये असतो. या पाळीव प्राण्यावर शेतकर्‍याचे आपल्या कुटुंबियासारखाच जिवापाड प्रेम असते. ते प्राणी जणू त्यांच्या कुटुंनाबाचेच सदस्य असतात. त्यात जर तो पाळीव प्राणी कुठल्या शर्यतीत भाग घेणारा असेल तर मालकाचे व त्या प्राण्याचे एक वेगळेच भावनिक नाते तयार होत असते। अश्याच एक शेतकरी व त्याच्या घोड्याच नात जगासमोर आल आहे. त्याच कारण आहे इगतपुरी तालुक्यातील कडवदरा येथील शेतकरी संदीप रोंगटे आपल्या घोड्याच्या दशक्रिया विधीचे आयोजन केले आहे.

शेतकरी संदीप रोंगटे यांच्या अत्यंत लाडक्या असलेला राजा घोड्याचा २४ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता. राजा घोड्याचा मृत्यू झाल्यानंतर रोंगटे यांनी रीतसर विधीवत पद्धतीने त्याचा अंत्यविधी केला होता. बुधवारी (दी.२) राजा याच्या मृत्युला दहा दिवस पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने रोंगटे यांनी राजाचा विधीवत दशक्रिया विधी करण्याचे ठरवले आहे. यावेळी ज्या पद्धतीने मनुष्याच्या दशक्रिया विधीची प्रक्रिया पार पडते त्याचप्रमाणे राजा घोड्याच्याही दशक्रिया विधी संपन्न होणार आहे. यावेळी रोंगटे कुंटुंबिय मुंडन करून आपल्या लाडक्या घोड्याप्रती ऋण व्यक्त करणार आहेत. राजा घोड्याने अनेक टांगा शर्यतीत भाग घेत त्याठिकाणी यश संपादन करत रोंगटे यांची मान उंचवण्याचे काम केलेले आहे. दरम्यान, दशक्रिया विधीच्या निमित्ताने रोंगटे परिवाराच्या वतीने हभप मनोहर महाराज घोडे यांच्या प्रवचन कीर्तनाचेही आयोजन केले आहे. त्याचसोबत आपले नातेवाईक, आत्पेष्ट, मित्र परिवार यांनाही निरोप धडण्यात आला आहे. एका घोड्याला अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे अखेरचा निरोप दिला जात असल्याने हा आगळावेगळा दशक्रिया विधी पंचक्रोशीत चर्चेचा बनला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -