घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रचक्क; १८ लाखांचा रस्ताच गेला चोरी

चक्क; १८ लाखांचा रस्ताच गेला चोरी

Subscribe

नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे गावातील 18 लाख रुपयांचा रस्ता चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने कुठलिही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवार (दि.14) पासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

ग्रामपंचायतीच्या पंधाराव्या वित्त आयोगाच्या निधीतून दाखवण्यात आलेला18 लाख रुपयांचा रस्ता चोरी गेल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराला महिना झाला तरी प्रशासनाने याबाबत कुठलिही कार्यवाही केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान हे या गावचे ग्रामस्थ आहेत. त्यांच्यासह देवा पाटील, रामदास बच्छाव, पंकज पाटील, साहेबराव वाघ, गणी शाह, प्रदिप पहाडे, सिध्दार्थ शेजवळ, रविंद्र जाधव, हिरामन कचवे यांनी उपोषण केले. कनिष्ठ अभियंता इंगळे यांनी या ग्रामस्थांची भेट घेवून उपोषण मागे घेण्याची तोंडी विनंती केली.

- Advertisement -

परंतु, इतका भ्रष्टाचार झालेला असूनही सत्ताधारी व प्रशासन गावातील या महत्वाच्या मुद्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विठोबा द्यानद्यान यांनी केला आहे. लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय बेमुदत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नारखेडे यांनी स्वत: या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -