घरताज्या घडामोडीओझरच्या विघ्नहर मंदिरात दरोडा; चांदीच्या छत्रीसह दानपेटी लंपास

ओझरच्या विघ्नहर मंदिरात दरोडा; चांदीच्या छत्रीसह दानपेटी लंपास

Subscribe

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझर येथील विघ्नहर गणपती मंदिरात पहाटेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे.

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझर येथील विघ्नहर गणपती मंदिरात पहाटेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. विघ्नहर गणपती मंदिरात हा दरोडा पडल्याचे समोर आले असून विघ्नहर गणपती मंदिरातील चांदीची छत्री आणि दानपेटी लंपास करण्यात आली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, याकरता जिल्हा प्रशासनाने देव दर्शन आणि मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बंद मंदिराला लक्ष करून दरोडेखोरांनी आज पहाटे हा डाव साधला आहे. यामध्ये गाभाऱ्यातील चांदीच्या वस्तू, चांदीची छत्री आणि दानपेटीची चोरी झाली आहे. चोरीचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने फुटेजच्या आधारे पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत असून मागील चार महिन्यांपासून ओझर देवस्थान मंदिर देवदर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. याचाच फायदा उचलत चोरट्यांनी मंदिरातील महागड्या वस्तूंवर हात साफ केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रोहिले ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून उजळली जिल्हा परिषद शाळा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -