घरमहाराष्ट्रCCTV : मिरजमध्ये देवीच्या मंदिरावर चोरट्याचा डल्ला

CCTV : मिरजमध्ये देवीच्या मंदिरावर चोरट्याचा डल्ला

Subscribe

एका अज्ञात चोरट्याने मंदिरातील देवीच्या अंगावर असणारे सोन्याचे दागिने त्याचबरोबर देवीची मूर्ती आणि इतर साहित्य लंपास केला आहे.

सांगलीच्या मिरजमध्ये एका चोरट्याने देवीच्या मंदिरावर डल्ला मारला आहे. मिरच्या चामुंडेश्वरी देवी मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्याने देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहे. शहरातल्या खाजावस्तीमध्ये ही घटना घडली आहे. चोरीचा हा प्रकार मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे मिरजमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मंदिरात चोरी 

मिरज शहरातल्या रेल्वे जंक्शन शेजारी असणाऱ्या खाजावस्तीमध्ये चामुंडेश्वरी देवीच्या मंदिरात चोरीची घटना घडली आहे. एका अज्ञात चोरट्याने मंदिरातील देवीच्या अंगावर असणारे सोन्याचे दागिने त्याचबरोबर देवीची मूर्ती आणि इतर साहित्य लंपास केला आहे. अंदाजे १५ ते २० तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि सात किलो चांदीची मूर्ती असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.

- Advertisement -

चोरी सीसीटीव्हीत कैद

पहाटेच्या सुमारास मंदिरात कोणी नसल्याचा फायदा उठवत चोरट्याने डल्ला मारला आहे. आज पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मिरजेच्या महात्मा गांधी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत, पंचनामा करत तपास सुरू केला आहे. यावेळ डॉग पथकाच्या सहाय्याने चोरट्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान मंदिरातून चोरी करणारा हा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून मिरज पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -