घरताज्या घडामोडीNagar Panchayat Election Results 2022 : कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांची एकहाती सत्ता, १०...

Nagar Panchayat Election Results 2022 : कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांची एकहाती सत्ता, १० जागांवर मुसंडी

Subscribe

नगरपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल आज (बुधवार) जाहीर झाला आहे. यामध्ये कवठेमहांकाळ नगरपंचायतीमधून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटलांची एकहाती सत्ता आली आहे. रोहित पाटलांची यशस्वी एन्ट्री झाली असून राष्ट्रवादीच्या १० जागांवरती त्यांनी विजय मिळवला आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत एकत्र आलेल्या विरोधकांनाही रोहित पाटलांनी आव्हान केलं होतं. परंतु हे आव्हान पूर्ण करत त्यांनी आबांचं स्वप्न पूर्ण केलंय.

रोहित पाटील यांची यशस्वी एन्ट्री

रोहित पाटील यांनी विजय मिळवल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी येथील सर्व लोकांचा आभारी आहे. कारण येथील सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हाती घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसवर झालेला अन्याय असेल किंवा येथील प्रश्न असतील. या प्रश्नांना घेऊनच आम्ही निवडणूक लढलो आणि लोकांनी आम्हाला यश दिलं. तसेच कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वर्गीय आबांचं स्वप्न होतं. परंतु आबांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलंय. मी, माझं कुटुंब आणि कार्यकर्त्यांनादेखील आबांची खूप आठवण येतेय, असं रोहित पाटील म्हणाले होते.

- Advertisement -

स्वर्गीय आबांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाला सत्तेत बसवलं आहे. तसेच अनेक दिग्गज नेत्यांनी निवडणुकीमध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आशीर्वाद दिला. त्यामुळे दिग्गजांच्या आशीर्वादामुळे आम्ही निवडणूक जिंकलो. परंतु विकास दृष्टीकोणातून आता पुढची वाटचाल असणार आहे, असं रोहित पाटील म्हणाले.

२० डिसेंबर रोजी राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. तेव्हा त्यांनी प्रचार सांगता सभेत तुफान फटकेबाजी केली. नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आबा म्हणजेच आर.आर. पाटील यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. असं वक्तव्य रोहित पाटील यांनी केलं होतं.

- Advertisement -

दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ९३ नगरपंचायतींमधील ३३६ जागांसाठी १८ जानेवारीला पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली होती. परंतु यामध्ये राष्ट्रवादीने अधिक जागांवर मुसंडी मारली असून कवठेमहांकाळ नगर पंचायतीमधून राष्ट्रवादीने १० जागा मिळवल्या आहेत.

मतमोजणीच्या आधी नगरपंचायत निवडणुकीत १९ उमेदवार बिनविरोधी विजयी झाले आहेत. रायगडच्या तळा नगरंपचायतीत शिवसेनेच्या एका उमेदवाराची बिनविरोधी निवड झाली आहे. तर रायगड्या म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. तसेच नाशिकच्या कळवणमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. नाशिक-देवळा नगरपंचायतीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोधी विजय झाले आहेत.अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला आहे.


हेही वाचा : Ahmednagar Nagar Panchayat Election Result 2022 : रोहित पवारांची कर्जतमध्ये बाजी, राम शिंदेंना मोठा धक्का


हेही वाचा : नगरपंचायत निकालानंतर आबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही – रोहित पाटील


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -