घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदे एकाच समाजाचे आहेत का?; रोहित पवारांचा टोला

मुख्यमंत्री शिंदे एकाच समाजाचे आहेत का?; रोहित पवारांचा टोला

Subscribe

एकनाथ शिंदे हे केवळ मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत का?, असा सवाल करत आमदार रोहित पवार म्हणाले, ज्या वेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, तेव्हा अशी वक्तव्ये केली जातात. अशी वक्तव्ये करणे चुकीचे आहे.

औरंगाबादः सर्व समाजासाठी एकत्र धोरण ठरवणे आवश्यक आहे. अन्य समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याकडेही लक्ष द्यायला हवे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या विधानावर केली.

एकनाथ शिंदे हे केवळ मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत का?, असा सवाल करत आमदार रोहित पवार म्हणाले, ज्या वेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, तेव्हा अशी वक्तव्ये केली जातात. अशी वक्तव्ये करणे चुकीचे आहे.

- Advertisement -

औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर केल्याच्या निर्णयाचे स्वागत करुन आमदार रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे व अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवरही भाष्य केले. ते म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजप करत आहे. भाजपच्या इशाऱ्यावरच केंद्रीय संस्था काम करत आहेत. जे जे भाजपच्या विरोधात बोलतात. त्यांच्यावर कारवाई होते. त्यामुळेच सर्वांनी एकत्र यायला हवे.

एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा चेहारा आपल्यापासून लांब जाता कामा नये. आपण त्यांना बोलावले पाहिजे, असे मी उद्धव ठाकरे यांना बोललो होतो. पण माझे ऐकले नाही. म्हणून आम्ही उठाव केला आणि मराठा चेहऱ्यामागे उभे राहिलो, मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केली, अशी कबुली शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथील कार्यक्रमात दिली. त्याला आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले.

- Advertisement -

याआधीही गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे समर्थक खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाढीवर हात फिरवला असता तरी राऊत उडून गेले असते, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म स्थळावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी चुकीचे विधान केले होते. त्यावरही गुलाबराव पाटील संतप्त झाले होते. शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करु शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजारांवर बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही. शिवरायांबद्दल कोणी चुकीचे बोलत असेल. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. त्याला माफ केले जाणार नाही. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही. मंत्रीपद गेलं खड्ड्यात, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -