घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राबद्दल खेद व्यक्त करत रोहित पवारांनी केलं तामिळनाडूचं अभिनंदन... काय आहे कारण?

महाराष्ट्राबद्दल खेद व्यक्त करत रोहित पवारांनी केलं तामिळनाडूचं अभिनंदन… काय आहे कारण?

Subscribe

 

मुंबईः सुमारे २३०० कोटी रुपयांचा प्रकल्प तामिळनाडू सरकारने खेचून नेला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र महाराष्ट्राबाबत अशा बातम्या दिसत नाही. आपलं राज्य मागे पडत असल्याचं दुःख होतंय, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करुन शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

- Advertisement -

जगभरात प्रसिद्ध असलेल्या नाइकी आणि आदिदास कंपन्यांचे उत्पादन बनवणारी पो चेन कंपनी भारतात गुंतवणूक करत आहे. या कंपनीचा सुमारे २३०० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. यातून २० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प तामिळनाडू सरकारने खेचून नेला. यासाठी रोहित पवार यांनी ट्वीट करुन तामिळनाडू सरकारचे कौतुक केले, तर शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणाही साधला.

- Advertisement -

जगभरात कोणत्याही खेळासाठी नाइकी आणि आदिदासची उत्पादने वापरली जातात. बहुतांश खेळाडू या कंपन्यांचे शूज हमखास वापरतात. त्यांना जगभरात मागणी आहे. या दोन्ही कंपन्यांची उत्पादने पो चेन कंपनी बनवते.  या कंपनीने जवळपास २७२ मिलिअनपेक्षाही अधिक पादत्राणे २०२२ मध्ये जागतिक स्तरावर विकल्या आहेत. बांगलादेश, कम्बोडिया, म्यानमार आणि व्हिएतनाम येथे या कंपनीचे प्लांट्स आहेत. अशी अग्रगण्य कंपनी भारतात गुंतवणूक करत आहे. त्या कंपनीचा प्रकल्प तामिळनाडू येथे होत असल्याने रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, नोकरभरतीवरुन रोहित पवार यांनी नुकतीच सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. राज्यात ७५ हजार पदं भरण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. परंतु विविध विभागांच्या मागणीनुसार, पदसंख्या १ लाख ४५ हजारांवर गेली आहे. त्यामधील ६ हजार ४९९ पदं आतापर्यंत भरण्यात आली असून उर्वरित पदांसाठी भरतीची तयारी सुरू आहे. दरम्यान, राज्यात ७५ हजार पदभरती करण्याची घोषणा सरकारने केली असून आतापर्यंत केवळ साडेसहा हजार पदंच भरली आहेत, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -