घरमहाराष्ट्र₹ 2000 नोट चलनातून बाद केल्याबद्दल रोहित पवार यांनी केले केंद्र सरकारचे...

₹ 2000 नोट चलनातून बाद केल्याबद्दल रोहित पवार यांनी केले केंद्र सरकारचे अभिनंदन

Subscribe

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) चलनातील 2000 रुपयांची नोट बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या निर्णयावरून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे.

केंद्र सरकारने 2016मध्ये आणलेल्या नोटाबंदीनंतर लगेचच 2000 रुपयांची नोट चलनात आणली होती. त्यानंतर 2018-19मध्ये या नोटांची छपाई थांबवण्यात आली आणि टप्प्याटप्प्याने या नोटा चलनातून काढून घेण्यात आल्या. आरबीआयने आता बाजारातून 2000 रुपयांच्या सर्व नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर 2023पर्यंत या नोटा बँकेत जमा करण्यास आरबीआयने सांगितले आहे. या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये 23 मेपासून बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत एकावेळी फक्त 20 हजार रुपयांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. तथापि, यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे.

- Advertisement -

नोटाबंदीनंतर 2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. तर, 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आली नाही. पण 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी टीका केली होती. काळ्या पैशाला आळा घालण्याच्या प्रयत्नात सरकारने 2000 रुपयांची नोट चलनात आणून बेहिशेबी संपत्ती निर्माण करणे सोपे केले आहे, असे डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले होते.

- Advertisement -

हाच संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. केंद्र सरकारने 2016 मध्ये 2000 रुपयांची चलनी नोट छापण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांनी ‘काळ्या पैशावर वचक आणायचा असल्यास जास्त किमतीच्या चलनी नोटा छापू नयेत’, असे मत व्यक्त केले होते. सर्व अर्थतज्ज्ञांचा हा सल्ला झुगारून केंद्र सरकारने 2000 रुपयांच्या नोटा छापून मोठी चूक केली. तथापि, आता सात वर्षानंतर अप्रत्यक्षपणे का होईना डॉ. मनमोहन सिंग यांचा सल्ला स्वीकारत चूक दुरुस्त केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -