Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची अडचण झाली असती, रोहित पवारांचा हल्लाबोल

अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची अडचण झाली असती, रोहित पवारांचा हल्लाबोल

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र दौरा होता. या दौऱ्यात मोदींनी देहूमधील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन केले. मंदिराच्या उद्धाटनानंतर उपस्थित वारकऱ्यांना संबोधित करताना मोदींनी ११ हजार कोटींचा निधी पालखी मार्गासाठी देणार असल्याची मोठी घोषणा केली. मात्र, या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच (Ajit Pawar) जास्त चर्तेत राहिले आहेत.

या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भाषण करण्याची संधी दिली. मात्र, राज्य सरकारचा भाग असणारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची संधी दिलीच नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी आता भाजपवर (BJP) हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची अडचण झाली असती, असं राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हणत भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे.

रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

- Advertisement -

छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू दिले नाही, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार पुढे म्हणाले की, वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही. अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजप नेत्यांचं झालं असावं.
असो संत तुकोबारायांच्या दर्शनाने नक्कीच सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होईल, अशी अपेक्षा!

- Advertisement -

 हा महाराष्ट्राचा अपमान : खासदार सुप्रिया सुळे

देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांनी केंद्र सरकारची एकप्रकारे कानउघडणी केली आहे.


हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान – सुप्रिया सुळे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -