घरताज्या घडामोडीआमदारांवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो, रोहित पवारांची प्रतिक्रिया...

आमदारांवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो, रोहित पवारांची प्रतिक्रिया…

Subscribe

विधानपरिषदेच्या निवडणुकीला (MLC Election) आज सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसह भाजपच्या पक्षांची बस विधानमंडळात दाखल झाली आहे. यावेळी भाजप आमदार हरिभाऊ बागडेंनी पहिलं मतदान केलं आहे. दरम्यान, आमदारांवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो, अशी प्रकारची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

आमदारांवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो

विधीमंडळाबाहेर रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी रोहित पवार म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीने आम्हाला खूप काही शिकवलं आहे. यामध्ये विरोधी पक्ष कोणत्याही क्षणी कुठल्याही पातळीला जावू शकतात. कोणत्याही आमदारावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो. यासर्व गोष्टी आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत पाहिल्या आहेत. राजकीय निवडणूक आयोगाचा देखील यामध्ये प्रश्न होता. परंतु राज्यसभेचा निकाल आम्ही सर्वांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्या-त्या पक्षाची काळजी महाविकास आघाडीने घेतलेली आहे. आमचे सर्व आमदार भक्कमपणे महाविकास आघाडीसोबत आहेत, असं रोहित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : विधान परिषदेच्या आखाड्यात आज दस का दम

आमचे सर्व आमदार निवडून येतील

गेल्यावेळेस एक मत बाद झाल्यामुळे सर्व समीकरण त्याठिकाणी बदललं. परंतु यावेळी एक-एक मतांची काळजी यावेळी आम्ही घेतलेली आहे. परंतु आमचे सर्व आमदार निवडून येतील, असा आत्मविश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, आजच्या विधान परिषद निवडणुकीत आघाडी आणि भाजपला किती आमदारांचे समर्थन आहे, याचा अंदाज निकालातून येणार आहे. त्यामुळे मतं मिळविण्यासाठी दोन्ही बाजूने सर्वशक्तीनिशी प्रयत्न सुरू असून या प्रयत्नात आघाडीचे पहिल्या आणि दुसर्‍या, तर भाजपच्या तिसर्‍या, चौथ्या, पाचव्या क्रमांकाचे उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा :महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा 


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -