घरताज्या घडामोडीमनसेने आपल्या राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला

मनसेने आपल्या राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Subscribe

मनसेचे सचिव सचिन मोरे (Sachin More) यांनी आज शेअर केलेल्या फोटोंवरून (Photos Share) राजकीय वर्तुळात सध्या चर्चेला उधाण आलं आहे. या फोटोंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह दिसत आहेत. यावरून राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी सिंह यांना शरद पवारांनीच रसद पुरवल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरे आणि मनसेला टोला लगावला आहे.

- Advertisement -

भाजप आपला वापर करून घेतंय

राज ठाकरे राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय, तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खासदार बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये, असं रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

…आपल्या राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी

राहिला प्रश्न आदरणीय शरद पवार साहेब आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा. तर पवार साहेब हे अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे ‘भारतीय कुस्ती संघा’चे अध्यक्ष आहेत. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळे संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल, असा टोला रोहित पवारांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

- Advertisement -

दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे आणि शरद पवार यांचा दुसरा फोटो ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे शरद पवारांना हातात हात देत एका कार्यक्रमातल्या स्टेजवर चढण्यासाठी मदत करत असल्याचं दिसून येत आहे. “आधारवड”. पवार साहेब! (काही फोटो चांगले ही असतात आणि खरेही) (हिंदी भाषांतर जाणीवपपुर्वक टाळले आहे), असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.


हेही वाचा : पवार आणि बृजभूषण यांच्या फोटोचा राजकारणाशी संबंध नाही, मनसेच्या त्या ट्विटवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -