घरताज्या घडामोडीईडीला ज्या बातम्या कळत नाहीत त्या सोमय्यांना आधी कळतात, रोहित पवारांची खरमरीत...

ईडीला ज्या बातम्या कळत नाहीत त्या सोमय्यांना आधी कळतात, रोहित पवारांची खरमरीत टीका

Subscribe

राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कर्जत नगर पंचायत निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या लोकांनी किरीट सोमय्या यांना जे काम दिलं आहे. ते काम ते योग्य पद्धतीने करताहेत. कारण ईडीला ज्या बातम्या कळत नाहीत त्या सोमय्यांना आधी कळतात, अशी खरमरीत टीका रोहित पवारांनी केली आहे. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपच्या लोकांनी किरीट सोमय्यांना जे काम दिलं आहे. ते योग्य पद्धतीनं करत आहेत. ईडीला ज्या बातम्या कळत नाहीत त्या सोमय्यांना आधी कळतात. ते जसे भाजपचे प्रवक्ते आहेत तसेच ईडीचेही प्रवक्ते आहेत. सोमय्या हे राजकारण करत आहेत हे सर्वांनाच कळतं. अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

भाजपवर निशाणा साधताना यावेळी कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे १७ पैकी १७ उमेदवार विजयी होतील असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसेच त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या ट्विटला प्रत्यूत्तर दिलं आहे. भाजपचे लोक आमच्याकडे येत असतात. तर हे प्रश्न त्यांना विचारला हवा की ते राष्ट्रवादीमध्ये का येत आहेत? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला.

- Advertisement -

चंद्रकात पाटलांच्या ट्विटवर पलटवार

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ऐनवेळी भाजपा उमेदवाराचा पाठिंबा मिळवण्याची वेळ राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यावर आली हा त्यांचा निवडणुकीपूर्वीच झालेला पराभव आहे. शरद पवार यांचा वारसा, राज्यात सत्ता, अजित पवार उपमुख्यमंत्री असूनही रोहीत पवार यांना एकेका जागेसाठी झुंजावे लागते, असं ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. दरम्यान, मग तुम्ही काय ईडीच्या जोरावर राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये घेता काय?, असा सवाल पाटलांना विचारला आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा आणि मैदानात यावं, अमित शहांचं खुलं आव्हान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -