घरताज्या घडामोडीउद्योगपती गौतम अदानी बारामती दौऱ्यावर, रोहित पवारांकडून अदानींच्या गाडीचं सारथ्य

उद्योगपती गौतम अदानी बारामती दौऱ्यावर, रोहित पवारांकडून अदानींच्या गाडीचं सारथ्य

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले. तसेच बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या उद्घाटनाला गौतम अदानी उपस्थित आहेत. कार्यक्रमस्थळी रवाना होताना आमदार रोहित पवार यांनी अदानींच्या गाडीचं सारथ्य केलंय.

देशातील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती दौऱ्यावर आहेत. अदानी बारामतीत दाखल झाले आहेत. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित एका कार्यक्रमाला गौतम अदानी हजर राहणार आहेत. काही वेळापूर्वी ते बारामतीच्या विमान तळावर दाखल झाले यावेळी आमदार रोहित पवार उपस्थित होते. अदानींच्या गाडीचं सारथ्य रोहित पवार यांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी बारामती दौऱ्यावर आहेत. गौतम अदानी बारामती विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले. तसेच बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या उद्घाटनाला गौतम अदानी उपस्थित आहेत. कार्यक्रमस्थळी रवाना होताना आमदार रोहित पवार यांनी अदानींच्या गाडीचं सारथ्य केलंय.

- Advertisement -

राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम करण्यात येत आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हजर आहेत.

बारामतीमध्ये उभारण्यात आलेल्या सायन्स पार्कमुळे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि नवीन माहिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्य व वैज्ञानिक जागृतीत वाढ करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. या केंद्रामुळे परदेशातील शिक्षण मुलांना भारतात घेता येणार आहे. तसेच मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. फन सायन्स गॅलरी, अॅग्रीकल्चरल गॅलरी, 3डी थिएटर, इनोव्हेशन हब, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंतेड रीलिटी असे तंत्रज्ञान भविष्यात मुलांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

बारामती सायन्स पार्कचे उद्घाटन केल्यानंतर बारामतीतील कृषी महाविद्यालयातील अटल इन्क्युबेशन सेंटरमध्ये शरद पवार यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या फेलोशिप सर्टिफिकेटचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रम आटोपल्यानंतर गौतम अदानी यांच्यासाठी शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे.


हेही वाचा : भुजबळांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, ओबीसी आरक्षणावर होणार चर्चा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -