घर महाराष्ट्र "माझी भूमिका स्पष्ट म्हणून अजित पवारांनी..." रोहित पवारांची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया

“माझी भूमिका स्पष्ट म्हणून अजित पवारांनी…” रोहित पवारांची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया

Subscribe

अजित पवारांकडून भाजपसोबत जाण्यापूर्वी रोहित पवारांना ऑफर देण्यात आली होती का? याबाबत पहिल्यांदाच रोहित पवारांकडून खुलासा करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवार यांनी अजित पवारांबाबत आपली स्पष्ट भूमिका स्पष्ट केली.

मुंबई : जुलै महिन्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील काही समर्थक आमदारांच्यासोबत बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. ज्यानंतर राजकारणात बऱ्याच नाटकीय घडामोडी घडल्या. ज्यानंतर शरद पवार यांनी पुतण्याच्या विरोधात म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात पुन्हा एकदा नव्याने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून राज्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात वर्षभरापूर्वी जे काही घडले त्याचीच पुनरावृत्ती होत असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवार हे सतत शरद पवार यांच्यासोबत पाहायला मिळतात. त्यामुळे आजोबा आणि नातवाची ही जोडी राजकारणातला नवा अध्याय लिहिणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु, अजित पवारांकडून भाजपसोबत जाण्यापूर्वी रोहित पवारांना ऑफर देण्यात आली होती का? याबाबत पहिल्यांदाच रोहित पवारांकडून खुलासा करण्यात आला आहे. (Rohit Pawar expressed his opinion about Ajit Pawar in clear words)

हेही वाचा – INDIA आघाडीच्या बैठकीत पोहोचला राजस्थानातील किसान महापंचायतचा मोर्चा

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवार यांनी अजित पवारांबाबत आपली स्पष्ट भूमिका स्पष्ट केली आहे. मी अजित पवार यांचा पुतण्या आहे. वैयक्तिक स्तरावर काका म्हणून मला त्यांचा आदर आहे. पण त्यांनी जी राजकीय विचारसरणी निवडली आहे किंवा ते ज्या भाजपच्या प्रतिगामी विचारसरणीबरोबर गेले आहेत. तो विचार मला आवडत नाही. त्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून संघर्ष नक्कीच होणार आहे. माझी भूमिका इतकी स्पष्ट आहे की अजित पवार यांनी मला विचारलेच नाही, असा खुलासा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

अजित पवार यांनी बंडखोरी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच अजित पवार गटाची बैठक पार पडली. त्यावेळी अजित पवार यांनी वय झाले, कुठेतरी थांबायला पाहिजे, अशी टीका शरद पवार यांच्यावर केली. याबाबत रोहित पवारांना विचारले असता, ते म्हणाले की, अजित पवारांच्या वक्तव्याकडे मी कसा बघतो? हे बघण्यापेक्षा प्रेक्षकांनी त्याला कसा प्रतिसाद दिला ते बघा. पण पवार म्हणून मला ती गोष्ट आवडली नाही. 100 टक्के आवडली नाही. स्वत: अजित पवारांनाही ते वक्तव्य आवडले नसावे. पण त्यांच्या आधी भाषण करणाऱ्या लोकांनी मन मोकळे झाले पाहिजे, अशाप्रकारे भाषण केले. त्या वातावरणात कधी कधी स्वत:वरचं नियंत्रण जाऊ शकते, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -