Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Rohit Pawar : "...आमचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत"; मराठवाडा विद्यापीठातील तरुणाने रोहित...

Rohit Pawar : “…आमचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत”; मराठवाडा विद्यापीठातील तरुणाने रोहित पवारांनाच सुनावलं

Subscribe

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अजित पवारांच्या (AJit Pawar) बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) प्रथमच मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. मराठवाड्याने शरद पवारांना त्यांच्या पडत्या काळात साथ दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. याशिवाय मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार बीड जिल्ह्यात असल्यामुळेच शरद पवारांनी पक्ष फुटीनंतरची दुसरी सभा बीडमध्ये आयोजित केल्याची चर्चा आहे. सध्या मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वादळी दौरे सुरू आहेत. शरद पवार आणि रोहित पवार (Rohit Pawar) विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. छत्रपती संभागीनगरमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेतून शरद पवार यांनी विरोधकांवर टीका केली तर, रोहित पवार यांनी तरुणांशी संवाद साधल्याचे पाहायला मिळाले. (Rohit Pawar our questions will not go away A young man from Marathwada University told Rohit Pawar only)

हेही वाचा – Jitendra Awhad : मुंडेंना पक्षात घ्यायचंच नव्हतं, शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना…”; आव्हाडांचा गौप्यस्फोट

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (16 ऑगस्ट) ‘विद्यार्थी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एमपीएससी आयोगाच्या परीक्षा, विविध विभागातील भरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस संस्थांकडून घेण्यात येणारे परीक्षा शुल्क, सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांकडून संशोधक विद्यार्थ्यांची होणाऱ्या कोंडीवर विविध विद्यार्थ्यांनी प्रश्न मांडले. तसेच परमेश्वर माने याने परीक्षा शुल्काचा मुद्दा उपस्थित करत विद्यार्थ्यांची होणारी लुट थांबविण्याची मागणी केली. तर डॉ. गणेश बडे यांनी प्राध्यापक, शिक्षकांची 100 टक्के भरतीची मागणी केली. यावेळी एका तरुणाने रोहित पवारांनाच सुनावल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा – Jitendra Awhad : …आता नातू तुमच्यासाठी लढायला तयार झालेत; आव्हाडांनी बीडमधील सभेत व्यक्त केला विश्वास

तुमची भांडणं मिटल्याशिवाय आमचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत

- Advertisement -

दरम्यान, राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य करताना एक तरुण म्हणाला की, तुमची आपापसातली भांडणं मिटल्याशिवाय आमचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. तरुणाच्या या आरोपावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, सत्तेसाठी लढणारी माणसं आम्हाला सोडून गेली आहेत. आमच्या सोबत राहिलेली माणसं विचारांसाठी लढणारी आहोत. कारण आमच्यासाठी विचार महत्वाचा आहे. तुम्ही जसं आपल्या आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करता, त्याप्रमाणे आम्हीदेखील आमच्या विचारांसाठी लढत आहोत, असे रोहित पवार म्हणाले.

- Advertisment -