घरताज्या घडामोडीRohit Pawar : दादांकडे विरोधी पक्षनेत्याचं पद पण... रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar : दादांकडे विरोधी पक्षनेत्याचं पद पण… रोहित पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शनिवारी २५ वा वर्धापद दिन आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर इतर नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, अजित पवारांकडे विरोधी पक्ष नेत्याचं पद आहे आणि अजून एक पद जर त्यांना मिळालं असतं, तर कुठेतरी अन्याय झाला असता, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली.

पवारांनी सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन ही घोषणा केली

रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवारांनी घोषणा करत असताना सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन ही घोषणा केली आहे. पक्षाकडून एखादी घोषणा करण्यात आली की, ती आम्ही स्वीकारतो. मी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच काम करू. आज महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता म्हणून अजित पवारांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काम आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत.

- Advertisement -

…तर कुठेतरी अन्याय झाला असता

अजित पवारांना कोणतीही जबाबदारी दिली नाही, अजित पवारांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, रोहित पवार म्हणाले की, तुम्ही याआधीचा इतिहास बघा. ते प्रत्येकवेळी मीडियासमोर येतात असं नाही. आज महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदानंतर जर कुठलं महत्त्वाचं पद असेल तर ते म्हणजे विरोधी पक्षनेत्याचं पद आहे. ते पद आता अजित पवारांकडे आहे. आमदार म्हणून त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेत असतो. अजित पवारांकडे विरोधी पक्ष नेत्यांचं पद आहे आणि अजून एक पद जर त्यांना मिळालं असतं, तर कुठेतरी अन्याय झाला असता. महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न हे अजित पवार मांडतात. त्यामुळे त्याचं हे पद अत्यंत महत्त्वाचं आणि संवैधानिक आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

कार्यकर्ता, पदाधिकारी ध्येयाने काम करतील –  अजित पवार

शरद पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘ऱ्हदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र’… हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयाने काम करतील, हा विश्वास आहे. नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे पुन:श्च अभिनंदन, असं ट्वीट अजित पवारांनी केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरवतील’, अजित पवारांकडून नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षांना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -