Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी गाडीखाली चिरडणाऱ्या मस्तवाल मुलाचा बाप..., रोहित पवारांचं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

गाडीखाली चिरडणाऱ्या मस्तवाल मुलाचा बाप…, रोहित पवारांचं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. तेव्हा कोण मिश्रा? मी त्यांना ओळखत नाही, असा खोचक टोला शरद पवार यांनी अजय कुमार मिश्रा यांना लगावला होता. त्यावर बुधवारी अजय मिश्रा यांनी पलटवार करत शरद पवार यांना मीसुद्धा ओळखत नाही, असं म्हटलं होतं. मात्र, या आरोप-प्रत्यारोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत मिश्रा यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

‘लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या मस्तवाल मुलाचा बाप’, अशी ‘ओळख’ करून देण्याची वेळ आदरणीय पवार साहेबांवर कधी आली नाही, हे सत्ता डोक्यात भिनलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना राज्यातल्या एखाद्या भाजप नेत्याने सांगण्याची गरज आहे. आपल्या मुलाने केलेल्या ‘कर्तृत्वावर’ वडील म्हणून राजीनामा दिला असता तर त्यांना गांभीर्याने घेतलं असतं, असं रोहित पवार म्हणाले.

- Advertisement -

राहिला प्रश्न त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा… तर लढत ही तुल्यबळांच्यात होत असते.. आदरणीय पवार साहेबांची राजकीय कारकीर्द मिश्रा यांच्या वयापेक्षा जास्त आहे, त्यांनी साहेबांना विरोधात निवडणूक लढवण्याचं आव्हान देणं हे निव्वळ हास्यास्पद आहे. त्यांच्या वक्तव्याची बातमी झाली यातच त्यांनी समाधान मानावं, असंही रोहित पवार म्हणाले.

- Advertisement -

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील तिकोनिया या ठिकाणी झालेल्या शेतकऱ्यांच्या अपघातप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर अलिकडेच आरोप निश्चित करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलन सुरू असताना उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी या ठिकाणी ३ ऑक्टोबर २०२१ रोजी अजय मिश्रा याच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले होते.

लखीमपूर खिरी हिंसा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरोपी आशिष मिश्रा याला अंतरिम जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने मिश्राला सशर्त ८ आठवड्यांचा जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले होते. तसंच, कोर्टाने आशिष मिश्राला निर्देश दिले आहेत की, त्याने त्याच्या लोकेशनविषयी संबंधित न्यायालयाला माहिती द्यावी. आशिष मिश्राच्या कुटुंबीयांकडून जर पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला अथवा सुनावणीस उशीर करण्याचा प्रयत्न झाला तर जामीन रद्द होऊ शकतो, असंही न्यायालायने स्पष्ट केलं होतं. दरम्यान, या घटनेवरून रोहित पवारांनी अजय मिश्रा यांच्यावर निशाणा साधला असून मिश्रा काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : लखीमपूर खिरी हिंसाप्रकरणात आशिष मिश्राला सशर्त जामीन मंजूर, उत्तर प्रदेश सोडण्याचे आदेश


 

- Advertisment -