घरमहाराष्ट्रपार्थसाठी माढा सोडले...; रोहित पवार म्हणतो 'साहेब तुम्ही लढाच'!

पार्थसाठी माढा सोडले…; रोहित पवार म्हणतो ‘साहेब तुम्ही लढाच’!

Subscribe

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ साठी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असताना, त्यांच्या दुसऱ्या नातवानं म्हणजेच रोहित पवार यांनी आजोबांना निवडणूक लढवण्याची गळ घातली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा काल, सोमवारी पुण्यातील एका पत्रकार परिषदेत केली. सोबतच त्यांनी पार्थ अजित पवार हे मावळमधून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आपल्या नातवासाठी – पार्थ पवारसाठी आजोबा दोन पावलं मागे आले आहेत. त्यामुळे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांची मावळमधील उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असताना, शरद पवार यांच्या दुसऱ्या नातवानं म्हणजेच रोहित पवार यांनी आजोबांना निवडणूक लढवण्याची गळ घातली आहे. ‘साहेब, आपण निर्णयाचा पुनर्विचार करा, निवडणूक लढा’, असे रोहितने त्याच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सुचित केले आहे.

काय म्हणाले रोहित पवार,

राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्ष फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाच, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं.

एक कार्यकर्ता म्हणून,

- Advertisement -

“साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा.”

बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -