Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रRohit Pawar : "अजितदादा 'CM' झाले तर मी स्वत:...", रोहित पवारांचं विधान...

Rohit Pawar : “अजितदादा ‘CM’ झाले तर मी स्वत:…”, रोहित पवारांचं विधान चर्चेत

Subscribe

Rohit Pawar On Evm : महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या 'ईव्हीएम'ध्ये अडकतेय का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

महायुतीनं बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याबद्दल अजूनही सस्पेन्स कायम आहे. महायुतीतीत तीनही नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी गुरूवारी तब्बल अडीच तास खलबते झाली. पण, अद्यापही मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला नाही. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) आमदार रोहित पवार यांनी अजितदादा पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे.

अजितदादा मुख्यमंत्री होत असतील, तर मी स्वत: पुष्पगुच्छ घेऊन देईन. पुतण्या म्हणून त्यांचा आशीर्वाद घेईन, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

- Advertisement -

हेही वाचा : फडणवीस अन् अजितदादांचे हसरे चेहरे, शिंदेंचा चेहरा गंभीर; अडीच तासांच्या बैठकीनंतर काळजीवाहू ‘CM’ म्हणाले…

रोहित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे केंद्रात जातील आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असं दिसत आहे. मात्र, अजितदादा मुख्यमंत्री होत असतील, तर मी स्वत: जाऊन फुलांचा गुच्छ देईन आणि पुतण्या म्हणून त्यांचा आशीर्वाद घेईन.”

- Advertisement -

‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला आहे. “महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या ‘ईव्हीएम’ध्ये अडकतेय का? लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर निवडणूक आयोगानं समोर आलं पाहिजे. महाराष्ट्र हे देशातील विकसित राज्य आहे. बहुमत असताना देखील महाराष्ट्राचा निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावं लागतं आहे.”

हेही वाचा : पहिल्यांदाच समोर आले शहाजीबापू, तीन नेत्यांना केलं टार्गेट; पराभवासाठी जिवलग मित्राला दिला दोष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -