घर महाराष्ट्र Rohit Pawar : "भाजपच्या मुळावर घाव घालणे गरजेचे..." रोहित पवारांची सडकून टीका

Rohit Pawar : “भाजपच्या मुळावर घाव घालणे गरजेचे…” रोहित पवारांची सडकून टीका

Subscribe

शरद पवार यांच्या कोल्हापुरातील सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सभेबाबत माहिती देतानाच भाजपकडून करण्यात आलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर आपले मत व्यक्त केले आहे.

कोल्हापूर : शरद पवार हे राजकारणातील चाणक्य आहेत आणि याबाबत सर्वांनाच माहिती आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर 82 वर्षीय शरद पवार हे पुन्हा एकदा नव्याने मैदानात उतरले आहेत. पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्याची सुरुवात शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यापासून केली. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका हा अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पवारांनी देखील राजकीय खेळी करत आपल्या नव्या इनिंगची सुरुवात येवल्यातून केली. त्यानंतर त्यांची दुसरी जाहीर सभा ही गुरुवारी (ता. 17 ऑगस्ट) बीडमध्ये झाली. त्यानंतर आता शरद पवार नवी खेळी करत पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणीची सुरुवात करणार आहेत. कारण कोल्हापुरात शरद पवार यांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली तर राज्यातील तिसरी सभा होणार आहे. त्यांच्या कोल्हापुरातील या सभेवर सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असला तरी हसन मुश्रीफ यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग या ठिकाणी आहे. शरद पवार यांची 25 ऑगस्टला सभा होणार आहे.

हेही वाचा – Rahul Narwekar : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल कधी? विधानसभा अध्यक्षांनी दिली माहिती

- Advertisement -

शरद पवार यांच्या कोल्हापुरातील सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. शरद पवार गटातील नेते या सभेसाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेचा आढावा घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचवेळी कोल्हापुरात गेलेल्या आमदार रोहित पवार यांना पत्रकारांकडून काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी सभेबाबत माहिती देतानाच भाजपकडून करण्यात आलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर आपले मत व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर सडकून टीका देखील केली आहे. (Rohit Pawar scathing criticism of BJP)

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्राला पुरोगामी विचार दिला आहे. दसरा चौकातून पुन्हा एकदा महाराष्ट्राला पुरोगामी संदेश द्यायचा असेल त्यामुळे दसरा चौकाची शरद पवारांकडून निवड करण्यात आली असेल. येथील ताकद आहे ती कार्यकर्त्यांची आहे, आम्ही केवळ शरद पवार यांचा संदेश घेऊन आलो आहोत. आमदार किती आहेत त्याच्यापेक्षा कार्यकर्ते किती आहेत हे महत्वाचे आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

तसेच, शरद पवार यांना एका पत्रकारांने विचारले होते की आपल्यासोबत किती आमदार आहेत. त्यावेळी त्यांनी शून्य असे उत्तर दिले होते. आमदारांपेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांची ताकद घेऊन विचार जपण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. भाजपने घर फोडले, पक्ष फोडला, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर दोन पक्ष फोडले. त्यामुळे वार मुळावर होणे गरजेचे आहे. शरद पवार थेट मुळावर घाव घालतात, त्यांनी आधीपासूनच भाजपला टार्गेट केले आहे, असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला.

- Advertisment -