घरताज्या घडामोडीRohit Pawar : पैलवान कधीच म्हातारा होत नसतो; रोहित पवारांचा अजितदादांना टोला

Rohit Pawar : पैलवान कधीच म्हातारा होत नसतो; रोहित पवारांचा अजितदादांना टोला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत सहभाग घेतला. अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनेक खासदार, आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी वय झालं तरी थांबायचं नाव घेत नाही, असा टोला सातत्याने अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांना लगावला जात होता.

मुंबई : वय नाही तर जिद्द महत्वाची असते, हेच व्हॉटसअपवर आलेल्या कुस्तीच्या या व्हिडिओतून दिसतं. म्हणूनच वयाकडं बोट दाखवून तुम्ही थांबत का नाही? असा प्रश्न विचारायचा नसतो. पैलवान कधीच म्हातारा होत नसतो, असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. (rohit pawar targets ajit pawar on twitter ncp)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत सहभाग घेतला. अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनेक खासदार, आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी वय झालं तरी थांबायचं नाव घेत नाही, असा टोला सातत्याने अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांना लगावला जात होता. त्यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनीही वारंवार अजितदादांना प्रत्युत्तर दिले. मात्र आता या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) ट्वीट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

“वय नाही तर जिद्द महत्वाची असते, हेच व्हॉटसअपवर आलेल्या कुस्तीच्या या व्हिडिओतून दिसतं. म्हणूनच वयाकडं बोट दाखवून तुम्ही थांबत का नाही? असा प्रश्न विचारायचा नसतो. पैलवान कधीच म्हातारा होत नसतो. राहिला प्रश्न भजनाचा, तर भजन हा व्यक्तिगत भक्तीचा विषय असल्याने कोणत्याही वयात भजन करता येतं. त्यामुळं भजनाला वयाशी जोडणं, हेही चुकीचं आहे.. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी कोवळ्या वयात भक्ती आणि अध्यात्माचा पाया रचला हे कळणंही महत्त्वाचं असतं आणि ते कळायला अध्यात्मावर भक्ती आणि आस्था लागते”, असं म्हणत रोहित पवार यांनी शरद पवारांवर टीका केली.

सख्ख्या भावाच अजित पवारांना टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय जाहीर करत अजित पवारांवर टीका केली. “साहेबांचे वय झाले, म्हणून त्यांना कमजोर समजू नका. तुम्हाला तीन वेळा उपमुख्यमंत्री व 25 वर्षे मंत्री केले, हे विसरू नका, शेत करायला दिलं म्हणजे कोणी मालक होत नाही”, असा टोला काटेवाडीत ग्रामस्थांशी बोलताना बंधू अजित पवार यांना नाव न घेता लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – CM Eknath Shinde : विरोधकांवर टीका करा पण…, मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना पदाधिकारी, प्रवक्त्यांना सूचना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -