घरमहाराष्ट्रपुणेपुण्यातील रिक्षाबंद आंदोलनात रोहित पवारांचा शिंदेंवर निशाणा, म्हणाले शहराचा विकास...

पुण्यातील रिक्षाबंद आंदोलनात रोहित पवारांचा शिंदेंवर निशाणा, म्हणाले शहराचा विकास…

Subscribe

येत्या १० दिवसांत पुण्यातील जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या नेतत्त्वाखाली एक समिती नेमण्यात येणार आहे. यामध्ये आरटीओचे अधिकारी आणि ट्रॅफिक पोलीस विभागाचे अधिकारी सहभागी असणार आहेत. त्यानुसार, येत्या १० दिवसांत बेकायदा बाईक टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात येईल.

पुणे – पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांनी काल आक्रमक भूमिका घेतली. सरकारचं लक्ष वेधून घेण्याकरता चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आता यावरून राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. (Rohit Pawar on Rikshaw protest in Pune)

हेही वाचा – पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचा आजपासून बेमुदत बंद

- Advertisement -

शहराच्या वेगावर शहराची समृद्धी अवलंबून असते. पुण्याला वेगवान ठेवण्यात मोठे योगदान देणाऱ्या रिक्षाचालकांनी काल बाईक टॅक्सीविरोधात बंद पाळून चक्काजाम आंदोलन केले. रिक्षाचालकांच्या अडचणी समजून घेत मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाची दखल घ्यावी ही विनंती, असं ट्वीट रोहित पवारांनी केलं आहे.

दरम्यान, पुण्यासह पिंपरी चिंचवड येथे रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पीएमपीने ज्यादा बसेस सोडल्या होत्या. मात्र, रिक्षावर अवलंबून असणाऱ्या ग्राहकांना याचा मनस्ताप झाला. अखेर, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून बेकायदा टॅक्सी चालकांवर कारवाई होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी काल सायंकाळीच संप मागे घेतला.

- Advertisement -


येत्या १० दिवसांत पुण्यातील जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या नेतत्त्वाखाली एक समिती नेमण्यात येणार आहे. यामध्ये आरटीओचे अधिकारी आणि ट्रॅफिक पोलीस विभागाचे अधिकारी सहभागी असणार आहेत. त्यानुसार, येत्या १० दिवसांत बेकायदा बाईक टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा – राज्य सरकारने नौटंकी बंद करावी, स्वहस्ते नियुक्तीपत्रे देण्यावरून अजित पवारांचा घणाघात

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -