घरमहाराष्ट्रRohit Pawar : महाराष्ट्रातील थोर व्यक्तींचा इतिहास आधी...; रोहित पवारांचा आदित्यनाथांवर निशाणा

Rohit Pawar : महाराष्ट्रातील थोर व्यक्तींचा इतिहास आधी…; रोहित पवारांचा आदित्यनाथांवर निशाणा

Subscribe

संतभूमी असलेल्या आळंदीमध्ये आयोजित गीता- भक्ती अमृत महोत्सवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या मनोगतात योगी आदित्यनाथ म्हणाले की, समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले.

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथे आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे. माझी या भाजपामधील नेत्यांना विनंती आहे ही, एकतर महाराष्ट्रातील संत आणि थोर व्यक्तींचा इतिहास आधी समजून घ्या आणि नंतरच बोला, आणि इतिहास माहीत असूनही जाणीवपूर्वक खोटं बोलत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही अशा शब्दांत त्यांनी भाजपासह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. (Rohit Pawar The history of great people of Maharashtra first Rohit Pawar targets Adityanath)

संतभूमी असलेल्या आळंदीमध्ये आयोजित गीता- भक्ती अमृत महोत्सवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या मनोगतात योगी आदित्यनाथ म्हणाले की, समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतभर चेतना निर्माण केली. त्या कालखंडात औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देत असताना त्यांनी औरंगजेबाला इथे मरण्यासाठी सोडलं. तेव्हापासून आजपर्यंत औरंगजेबाला कुणीही विचारत नाही.

- Advertisement -

ही शौर्य आणि पराक्रमाची धरणी आहे, कारण या मातीत पूज्य संतांचे सानिध्य प्राप्त झाले असेही यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मला आळंदीत येण्याची खूप पूर्वीपासूनची इच्छा होती. मी लहानपणी ज्ञानेश्वरीचे वाचन केले होते. तेव्हापासून मला दिव्यविभूतीचे दर्शन घ्यायचे होते. अवघ्या 15 व्या वर्षी ज्ञानेश्वरीचे लिखाण करून ज्यांनी 21 व्या वर्षी समाधी स्वीकारली, त्या ज्ञानेश्वर माऊलींचे आज मला दर्शन घेता आले अशाही भावना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा : Akola Crime News : अकोल्यात खळबळ; जिल्हा परिषद शाळेच्या छतावर नवजात अर्भकांचे मृतदेह?

रोहित पवारांनी केला त्या वक्तव्याचा निषेध

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर आमदार रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर ट्वीट करत योगी आदित्यनाथांच्या त्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, महाराष्ट्रातील संत आणि थोर व्यक्ती यांच्याबाबत आजवर केवळ भाजपच्याच नेत्यांनी अनेकदा वादग्रस्त आणि आक्षेपार्ह व्यक्तव्य केली आहेत. याच यादीत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भर पडली. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं, अशा आशयाचं धादांत खोटं विधान त्यांनी केलं.

हेही वाचा : UBT Convention: ‘आले मोदींच्या मना’, भारतरत्नांची जणू खैरातच; कर्पूरी ठाकूर यांचा उल्लेख करत ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका

माझी या भाजपवाल्यांना विनंती आहे ही, एकतर महाराष्ट्रातील संत आणि थोर व्यक्तींचा इतिहास आधी समजून घ्या आणि नंतरच बोला, आणि इतिहास माहीत असूनही जाणीवपूर्वक खोटं बोलत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही असाही इशारा त्यांनी भाजपामधील नेत्यांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -