रोहित पवारांचा मनसेला टोला, तर रुपाली पाटलांची खोचक टीका

Rupali Patil Thombre reaction This is the murder of Vasant More
रोहित पवारांचा मनसेला टोला, तर रुपाली पाटलांची खोचक टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सचिव सचिन मोरे यांनी आज सकाळी शेअर केलेल्या फोटोवरून राजकीय वर्तुळात आरोप पत्यारोप सुरू झाले आहेत. यावरुन राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी बृजभूषण सिंह यांना शरद पवारांनीच रसद पुरवल्याचा आरोप मनसेकडून (mns) करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मनसेला प्रत्युत्तर दिले आहे. तर यावर राष्ट्रवादीच्य नेत्या रुपाली पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यात नेहमीची भाजप खेळी,आणि काहीजण वेड्याचे सौंग घेतात. पण, सर्वाना कळते अच्छे दिन लोकांन मध्ये आले आहेत समजण्याचे, असे म्हटले आहे.

हेही वाचा – राज ठाकरेंनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावं, बृजभूषण यांचा मनसेच्या आरोपानंतर टोला

रोहित पवारांचे ट्विट –

यावर राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला (MNS) ला हे कसे कळत नसेल? खासदार बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेने बघावे आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये, असे आमदार रोहित पवारांनी म्हटले आहे. यावर पुढे राहिला प्रश्न आदरणीय (Sharad Pawar) साहेब आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा…. तर पवार साहेब हे अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे ‘भारतीय कुस्ती संघा’चे अध्यक्ष आहेत. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपली राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळे संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल, असा टोला त्यांनी मनसेला लगावला आहे.

हेही वाचा – पवार आणि बृजभूषण यांच्या फोटोचा राजकारणाशी संबंध नाही, मनसेच्या त्या ट्विटवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

Rohit Pawar's criticism on MNS
त्यांनी तातडीने आपली राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी – रोहित पवार

अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर –

दरम्यान, यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे आणि शरद पवार यांचा दुसरा फोटो ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. अमोल मिटकरींनी आपल्या ट्वीटसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिसत आहेत. या फोटोमध्ये राज ठाकरे शरद पवारांना हातात हात देत एका कार्यक्रमातल्या स्टेजवर चढण्यासाठी मदत करत असल्याचे दिसून येत आहे. हा फोटोवर त्यांनी “आधारवड” र साहेब! (काही फोटो चांगले ही असतात आणि खरेही) (हिंदी भाषांतर जाणीवपपुर्वक टाळले आहे), असे म्हटले आहे.

नेहमीच भाजप खेळी, आणि काहीजन वेड्येचे सौंग घेतात पण सर्वांना कळते अच्छे दिन लोकांनमध्ये आले आहेत समजण्याचे