Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'साहेब तुमच्यासाठी किरकोळ असलेला त्रास आमच्यासाठी मोठा; लवकर बरं व्हा!', रोहित पवारांचे...

‘साहेब तुमच्यासाठी किरकोळ असलेला त्रास आमच्यासाठी मोठा; लवकर बरं व्हा!’, रोहित पवारांचे भावुक ट्विट

'आदरणीय पवार साहेब कोणताही त्रास तुमच्यासाठी किरकोळ असला तरी आमच्यासाठी तो मोठा असतो. लवकर बरं व्हा!', असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार भावुक झाले.

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळच्या वेळेस पोटात दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोले जात आहे. तसेच हा किरकोळ त्रास असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र, यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणतात, ‘आदरणीय पवार साहेब कोणताही त्रास तुमच्यासाठी किरकोळ असला तरी आमच्यासाठी तो मोठा असतो. लवकर बरं व्हा!’, असे म्हणत त्यांनी भावनिक ट्विट केले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

‘आदरणीय पवार साहेब कोणताही त्रास तुमच्यासाठी किरकोळ असला तरी आमच्यासाठी तो मोठा असतो. लवकर बरं व्हा! सर्वांच्या सदिच्छा तुमच्यासोबत आहेत! तुम्ही लवकर बरे व्हावेत म्हणून विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो’.

शरद पवार सोशल मीडियावर सक्रिय 

- Advertisement -

शरद पवार यांची प्रकृती बिघडली असल्याने सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र, तरी देखील ते Active असल्याचे दिसून येत आहे. त्यांची ज्या व्यक्तींनी प्रकृत्तीबाबत विचारणा केली त्यांचे पवार यांनी ट्विटरवरुन आभार मानले आहेत. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, लता मंगेशकर यांचे त्यांनी आभार मानले आहेत. यावरुन ते रुग्णालयात असताना देखील सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -


हेही वाचा – शरद पवारांची प्रकृत्ती स्थिर; बुधवारी होणार शस्त्रक्रिया


 

- Advertisement -