घरमहाराष्ट्र..म्हणून जेसीबीने गुलाल उधळला

..म्हणून जेसीबीने गुलाल उधळला

Subscribe

मिरवणुकीवर रोहित पवारांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादीचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी नुकतीच आपल्या मतदारसंघात विजयाचा जल्लोष करण्यासाठी मिरवणूक काढली. या मिरवणुकीदरम्यान जेसीबीद्वारे गुलाल उधळल्याने त्याची मोठी चर्चा झाली. या मुद्द्यावरून रोहित पवार यांच्यावर टीकाही झाली. याबाबत आता रोहित यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच पोहचल्यानंतर समजले की लोकांनी मोठ्या उत्साहात माझी मिरवणूक काढण्याची तयारी केली आहे. ही लोक म्हणजे नेमके कोण तर माझा विजय व्हावा म्हणून गेली सहा सात महिने रात्रीचा दिवस करणारी माझी हक्काची माणसे होती. अगदी दहा दहा रुपये गोळा करुन त्यांनी गुलाल आणला होता. यात जशी सामान्य माणसे होती तसेच जेसीबी असोशिएशन लोक देखील होते. त्यांनी आमच्या पद्धतीने तुमचा सत्कार करु असा आग्रह धरला,’ असा खुलासा रोहित पवार यांनी केला आहे.

- Advertisement -

“आपल्या आनंदामुळे अगदी एका व्यक्तीला जरी वाईट वाटले तर आपण त्या एका व्यक्तीचा विचार करायला हवा हेच मी लहानपणापासून शिकलो. कालचा दिवस हा माझ्यासाठी व कर्जत जामखेडच्या सर्वसामान्य मतदारांसाठी विशेष होता. कर्जत जामखेड हे माझे घर आहे, असे मी मानत आलेलो आहे. विजयी झाल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यात आले. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिवाळीसाठी वेळ देत असताना परतीच्या मान्सूनमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांबद्दल माहिती गोळा करण्यात आली.

विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच पोहचल्यानंतर समजलं की लोकांनी मोठ्या उत्साहात माझी मिरवणूक काढण्याची तयारी केली आहे. ही लोकं म्हणजे नेमके कोण तर माझा विजय व्हावा म्हणून गेली सहा सात महिने रात्रीचा दिवस करणारी माझी हक्काची माणसं. अगदी दहा दहा रुपये गोळा करुन त्यांनी गुलाल आणला होता. यात जशी सामान्य माणसं होती तसेच जेसीबी असोशिएशन लोक देखील होते. त्यांनी आमच्या पद्धतीने तुमचा सत्कार करु असा आग्रह धरला. तो आग्रह मी मोडणार नव्हतोच कारण त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या,असे रोहित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -