Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रRokhThok : अमित शहांचे नाटक महाराष्ट्राने पाहिले, संजय राऊतांचा घणाघात

RokhThok : अमित शहांचे नाटक महाराष्ट्राने पाहिले, संजय राऊतांचा घणाघात

Subscribe

अमित शहा सलग आठ दिवस महाराष्ट्रात प्रचार करीत आहेत. या काळात जम्मू-काश्मीरमध्ये 13 हल्ले अतिरेक्यांनी केले. त्यात 9 जवान ठार झाले आणि नागरिकही मेले. पुलवामात मरण पावलेले 40 जवानांचे ’आत्मे’ काश्मीरात आजही ’अस्वस्थ’ आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

(RokhThok) मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत भलताच पुळका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आला आहे. पण मराठी माणसांचे जे संघटन शिवसेनाप्रमुखांनी उभे केले, ते याच अमित शहा यांनी पैसा, पोलीस आणि ईडीच्या दहशतीने तोडले. आता तेच शहा आज काँग्रेसवाल्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत बोलावे असा शहाजोगपणा करतात. हे नाटक या निवडणूक प्रचारात महाराष्ट्राने पाहिले, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Sanjay Raut strongly criticizes Amit Shah)

‘उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर आहेत. त्यांनी काँग्रेसला वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी चार चांगले शब्द बोलायला सांगावे,’ असेही शहा म्हणाले. शहा हे सर्व प्रचारात का बोलतात? महागाई, आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा यावर अमित शहा यांनी मते मांडली नाहीत. महाराष्ट्रातले उद्योग आणि रोजगार गुजरातेत पळवून मराठी तरुणांचे नुकसान केले ते काही काँग्रेस किंवा गांधी-नेहरूंनी नाही, असे खासदार संजय राऊत यांनी सुनावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – RokhThok : एकनाथ शिंदेंचा कार्यकाळ अमित शहांनी संपवला, संजय राऊतांचा निशाणा

वीर सावरकर हा विधानसभा प्रचाराचा विषय नाही, पण अमित शहा यांनी तो प्रचारात आणला. सावरकरांना ’भारतरत्न’ द्या, ही शिवसेनेचीच मागणी आहे, याचा त्यांना विसर पडला असल्याचा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ कॉलमच्या माध्यमातून लगावला आहे.

- Advertisement -

370 कलम हटवून काय प्रकाश पाडला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शहा हेच भाजपाचे ’स्टार प्रचारक’ आणि तेच भाजपला महाराष्ट्रात बुडवताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकांत त्यांनी काश्मीरचे 370 कलम आणले. 370 कलम हटवण्यास विरोध करणाऱ्या लोकांच्या बाजूस माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे बसले आहेत, असे शहा म्हणतात. काश्मीरातून 370 कलम हटवून गृहमंत्री शहा यांनी काय प्रकाश पाडला? हा माझा त्यांना प्रश्न असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अमित शहा सलग आठ दिवस महाराष्ट्रात प्रचार करीत आहेत. या काळात जम्मू-काश्मीरमध्ये 13 हल्ले अतिरेक्यांनी केले. त्यात 9 जवान ठार झाले आणि नागरिकही मेले. पुलवामात मरण पावलेले 40 जवानांचे ’आत्मे’ काश्मीरात आजही ’अस्वस्थ’ आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. (RokhThok: Sanjay Raut strongly criticizes Amit Shah)

हेही वाचा – Aaditya Thackeray : कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ याच्याशी मी सहमत; आदित्य ठाकरेंचे वक्तव्य


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -