Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रRokhThok : एकनाथ शिंदेंचा कार्यकाळ अमित शहांनी संपवला, संजय राऊतांचा निशाणा

RokhThok : एकनाथ शिंदेंचा कार्यकाळ अमित शहांनी संपवला, संजय राऊतांचा निशाणा

Subscribe

मुंबईतील सर्व बिल्डर्स कोणाचे? हे भाजपाने सांगावे. या सर्व बिल्डरांमुळे मराठी माणसांना घरे मिळत नाहीत हे महत्त्वाचे. त्यांचे पोशिंदे फडणवीस आणि त्यांचे लोक आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

(RokhThok) मुंबई : महाराष्ट्र निवडणुकांसाठी सज्ज झाला आहे. शिंदे गटाचे दिल्लीतील नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन जाहीर केले की, आजच्या निवडणुका आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत, पण निकालानंतर नेता कोण हे आम्ही एकत्र बसून ठरवू. याचा अर्थ स्पष्ट आहे, शिंदे यांचा कार्यकाळ अमित शहा यांनी संपवला आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. (Sanjay Raut targets Amit Shah over Eknath Shinde’s chief ministership)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायला निघाले आहेत, पण महाराष्ट्राची जनता फडणवीस यांची सावलीही स्वीकारायला तयार नाही. गृहमंत्री फडणवीस यांच्या तीन वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराला तसेच गुन्हेगारीकरणाला सार्वत्रिक रूप आले. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे लोक गुन्हेगारी टोळ्यांचा वापर राजकारणासाठी करत आहेत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ कॉलममध्ये केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Aaditya Thackeray : कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ याच्याशी मी सहमत; आदित्य ठाकरेंचे वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्यासारख्या नेत्यांचा खून झाला आणि गुन्हेगार आपल्यापर्यंत पोहोचतील या भयाने गृहमंत्र्यांनी स्वत:चीच सुरक्षा वाढवून घेतली. अतिरेक्यांविरुद्ध लढण्यासाठी निर्माण केलेल्या फोर्स वन या खास सशस्त्र पथकाचे पहारे त्यांनी आपल्या घराभोवती लावले. सामान्य माणूस वाऱ्यावर आणि गृहमंत्र्यांना सुरक्षेचा खास गराडा. ऐन निवडणुकीत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना कोणापासून धोका आहे हे राज्याच्या जनतेला कळायलाच हवे, असे संजय राऊत यांनी सुनावले आहे.

- Advertisement -

मुंबईतील सर्व बिल्डर्स कोणाचे? हे भाजपाने सांगावे. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची सर्व दौलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच आहे, असा खुलासा जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. या सर्व बिल्डरांमुळे मराठी माणसांना घरे मिळत नाहीत हे महत्त्वाचे. त्यांचे पोशिंदे फडणवीस आणि त्यांचे लोक आहेत. हेच फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ही धोक्याची घंटा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (RokhThok: Sanjay Raut targets Amit Shah over Eknath Shinde’s chief ministership)

हेही वाचा – P. Chidambaram : भाजपच्या राजवटीत महाराष्ट्राची पीछेहाट; माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची टीका


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -