घरताज्या घडामोडीमध्य रेल्वे मार्गावर मार्च ते एप्रिलपर्यंत 194 मुलांची सुटका

मध्य रेल्वे मार्गावर मार्च ते एप्रिलपर्यंत 194 मुलांची सुटका

Subscribe

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या जवानांवर केवळ रेल्वेची मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेचीच जबाबदारी नसते. तर अनेक भरकटलेल्या, हरवलेल्या मुलांची सुटका करून त्यांच्या आईवडिलांकडे सोपवण्याची जबाबदारी ते पार पाडत असतात.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या जवानांवर केवळ रेल्वेची मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेचीच जबाबदारी नसते. तर अनेक भरकटलेल्या, हरवलेल्या मुलांची सुटका करून त्यांच्या आईवडिलांकडे सोपवण्याची जबाबदारी ते पार पाडत असतात. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहे. (RPF Central Railway Rescues 194 Children from March 2023 to April 2023)

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मार्च-2023 ते एप्रिल-2023 या कालावधीत मध्य रेल्वेवरील विविध रेल्वे प्लॅटफॉर्मवरील हरवलेल्या एकूण 194 मुलांची सुटका केल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF) सरकारच्या समन्वयाने 194 मुलांची सुटका केली आहे. यामध्ये 144 मुले आणि 50 मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.

- Advertisement -

काही घरातील भांडण, कौटुंबिक समस्या, शहरातील ग्लॅमरचे आकर्षण किंवा चांगले जीवन इत्यादींच्या शोधात अनेक मुले आपल्या कुटुंबियांना न सांगता मुंबईत येत असतात. शहरात आल्यानंतर विविध रेल्वे स्थानकावर येणाऱ्या मुलांना शोधण्याचे काम मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दल (Railway Protection Force), शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी करत असतात.

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत हे काम केलं जातं. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मध्य रेल्वेवरील विविध रेल्वे प्लॅटफॉर्मवरील हरवलेल्या एकूण 1399 मुलांची सुटका केली आहे. यामध्ये 949 मुलगे आणि 450 मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.


हेही वाचा – संसद भवन उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, ‘सोहळ्याला वादाची किनार उगाचच’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -