पुन्हा ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार; रामदास आठवलेंचे स्पष्टीकरण

'मागच्या निवडणुकीत मी शिर्डीतून पराभूत झालो होतो. मात्र आता मला पुन्हा शिर्डीतूनच उभं राहण्याची इच्छा आहे. जर भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डीतून लोकसभेची निवडणूक निश्चितपणे लढवेल', असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी सांगितले.

if dalit panthers were united there would have been a government in maharashtra said ramdas athawale

‘मागच्या निवडणुकीत मी शिर्डीतून पराभूत झालो होतो. मात्र आता मला पुन्हा शिर्डीतूनच उभं राहण्याची इच्छा आहे. जर भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डीतून लोकसभेची निवडणूक निश्चितपणे लढवेल’, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी सांगितले. शिर्डीत रिपाई पक्षाचे महाधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले. विशेष म्हणजे याचवेळी आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (rpi ramdas athawale will contest from shirdi lok sabha constituency)

‘मागच्या निवडणुकीत मी शिर्डीतून पराभूत झालो होतो. मात्र आता मला पुन्हा शिर्डीतूनच उभं राहण्याची इच्छा आहे. जर भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डीतून लोकसभेची निवडणूक निश्चितपणे लढवेल. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी माझा प्रयत्न असेल. आगामी निवडणुकीसाठी पक्ष सक्रीय झाला असून, शिर्डीत पक्षाचे महाअधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत’, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला नागालँड विधानसभेत दोन जागा मिळाल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये नागालँड राज्यात रिपाईचे दोन आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर पक्ष चांगलाच सक्रिय झाला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा माझा पक्ष मोठा

‘महाराष्ट्राच्या बाहेर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा माझा पक्ष मोठा असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. शिवसेनेचं चिन्ह आणि नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय लोकशाहीनुसार झाला आहे. निवडणूक आयोगानं बहुमताच्या बाजुनं निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरेंनी अगोदरच भाजपसोबत सरकार स्थापन करायला पाहिजे होते. भाजपसोबत सरकार स्थापन केले असते तर आज ही वेळ आली नसती’, अशा शब्दांत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.


हेही वाचा – Nashik Mumbai Long March : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी शेतकऱ्यांचे लाल वादळ पुन्हा मुंबईत धडकणार