महापरिनिर्वाणदिनी रिपाइंतर्फे अभिवादन सभा

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे ६ डिसेंबर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

CHAITYABHUMI
चैत्यभूमी

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता शिवाजी पार्क दादर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याची माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइंतर्फे करण्यात आले आहे.

वाचा : ‘या’ दिवशी राडा केल्यास होईल शिक्षा

गेल्या ४१ वर्षांपासून सभा सुरु 

रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने गेली २८ वर्ष आणि त्याआधी भारतीय दलित पँथरपासून अंदाजे सुमारे ४१ वर्षांपासून दरवर्षी शिवाजी पार्क येथे ६ डिसेंबरला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही शिवाजी पार्क येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आठवलेंच्या अध्यक्षतेत जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रिपाइंचे देशभरातील सर्व राज्यप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सोनवणे यांनी दिली आहे.

वाचा : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी सज्ज

वाचा : महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी जाहिर करा – आ. प्रकाश गजभिये

अशी आहे तयारी 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी येणार्‍या आंबेडकरी जनतेच्या सुविधेसाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी तात्पूरता निवारा, पिण्याच्या पाण्याचे टँकर, फिरते शौचालय आदी सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने त्यांचे अनुयाची चैत्यभूमीवर येत असतात. दरवर्षी त्यांच्यासाठी पालिकेकडून विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतात.