घरताज्या घडामोडीऊसतोड मजुरांच्या मुलांच्या वसतिगृहांसाठी १५ कोटी रुपये मंजूर - मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या वसतिगृहांसाठी १५ कोटी रुपये मंजूर – मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

Subscribe

सुरुवातीच्या टप्प्यात भाड्याच्या इमारतीमध्ये ही वसतीगृह चालवण्यात येणार

राज्यातील ऊसतोड मजूर मुला मुलींसाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात संत भगवानबाबा वसतीगृह योजना सुरु करण्यात आली आहे. २० निवासी वसतिगृह चालू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यात दहा मुलींची वसतिगृह आणि दहा मुलांची वसतिगृह असणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात भाड्याच्या इमारतीमध्ये ही वसतीगृह चालवण्यात येणार आहेत. परंतु येणाऱ्या एका वर्षात ही वसतिगृह बांधण्यासाठी लागणाऱ्या १५ कोटी रुपयांना मंत्रीमंडळात मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. (Rs 15 crore sanctioned hostel for children of sugarcane workers – decision in cabinet meeting)

संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या अंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची जास्त संख्या असलेले ४१ तालुके निवडून त्या प्रत्येक तालुक्यात १०० विद्यार्थी क्षमता असलेले मुला-मुलींसाठी मिळून दोन वसतीगृहे असे एकूण ८२ वसतीगृहे उभारण्यात येतील. या ठिकाणी निवास,भोजन आदी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

पाटोदा,बीड,परळी,गेवराई,माजलगाव नगर जिल्ह्यातील पाथर्डी,जामखेड आणि जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि अंबड या ठिकाणी ऊसतोड मजूरांच्या मुलांसाठी वसतिगृह करण्याचे ठरवण्यात आले आहे. या वसतिगृहांची सर्व आर्थिक जबाबदारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी सांगितली होती. राज्यात येणाऱ्या ऊस गाळ पाल्यामधून प्रत्येकी १० रुपयांप्रमाणे लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळाला द्यायचे. तेवढीत रक्कम राज्यसरकारने द्यायची. याच पैशातून ऊसतोड मजूरांच्या मुलांच्या शिक्षणाची,राहण्याची, जगण्याची त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्यापासून सर्व सुविधा देण्याची महामंडाळाची जबाबदारी असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे

ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या वसतिगृहांची योजना संत भगवान बाबा यांच्या नावाने सुरु करण्यात येणार आहे.  अनेक वर्ष हाल-अपेष्टा सहन करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा नवा मार्ग धनंजय मुंडे यांनी मोकळा केला असून, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वसतीगृहे उभारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.

- Advertisement -

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कष्टांचा विचार करून, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वसतीगृह योजनेचा घेतलेला हा निर्णय योगायोगाने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुण्यस्मरण दिनाच्या पुर्वसंध्येला जाहीर करत आहोत. हीच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात आपल्या भावना धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.


हेही वाचा – १२ वीच्या परीक्षा रद्द करण्यावर मंत्रिमंडळात चर्चा; शिक्षण खात्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनाकडे

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -