घरताज्या घडामोडीकोरोनाच्या संकटात तृतीयपंथीयांना १५०० रूपयांची आर्थिक मदत, सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

कोरोनाच्या संकटात तृतीयपंथीयांना १५०० रूपयांची आर्थिक मदत, सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

Subscribe

तृतीयपंथीयांना एकरकमी १५०० रुपयांचे अनुदान देण्याबाबत सामाजिक न्याय विभाग सकारात्मक पाऊले उचलत आहे

कोरोनाच्या पहिल्या लाटेत समाजातील छोट्या घटकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. काम धंदे बंद झाल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली. समाजातील तृतीयपंथीय देखिल यात होरपळले गेले. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असे होऊ नये म्हणून सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या संकंटकाळात तृतीयपंथीयांना १५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग पुढे आला आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात तृतीयपंथीयांची होणारी उपासमारी टळेल. याबाबात कशापद्धतीने मदत करता येईल यासाठी प्रशासकीय पातळीवर विचार केला जात आहे.


राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी ट्विट केले आहे. त्यातून त्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार देखिल मानले आहेत. सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘तृतीयपंथीयांना एकरकमी १५०० रुपयांचे अनुदान देण्याबाबत सामाजिक न्याय विभाग सकारात्मक पाऊले उचलत आहे. मला विश्वास आहे की यावर सकारात्मक निर्णय होईल. तृतीयपंथीय समाजाच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना आर्थिक मदत देण्याबाबत प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरु केल्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार.’

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे यांची तृतीयपंथीयांना मदत करण्यासाठी असलेली तळमळ व पाठपुरवठा अभिनंदनीय आहे असे म्हणत धनंजय मुंडेंनी सुप्रिया सुळे यांचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे आम्हाला सतत असे मार्गदर्शन करत रहावे असेही म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबवा – नाना पटोले

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -