घरताज्या घडामोडीसरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोरोना पॉझिटिव्ह; प्रकृती स्थिर

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोरोना पॉझिटिव्ह; प्रकृती स्थिर

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. (RSS Chief dr Mohan Bhagwat Corona Positive) संघाने शुक्रवारी ट्विटकरत याबाबतची माहिती दिली आहे. मोहन भागवत यांना काही लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट केली. या चाचणीनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

भागवत यांना लवकरच बरे वाटावे

डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील रात्री उशिरा याबाबत ट्विट केले. डॉ. भागवत यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी देवाकडे प्रार्थना करतो, असे गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून कडक निर्बंध जारी करूनही परिस्थितीत फारसा फरक पडताना दिसत नाही. हे लक्षात घेऊन राज्य सरकार पुढील आठवड्यापासून कडक लॉकडाऊनचा विचार करत आहे. यासाठी शनिवार, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. राज्यात ३० एप्रिलपर्यंत कोरोनाची मोठी लाट पसरणार असल्याचा अंदाज असल्याने तीन आठवड्याच्या लॉकडाऊनविषयी सरकार निर्णय घेण्याची दाट शक्यता असून तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.


हेही वाचा – संपूर्ण लॉकडाऊनकडे वाटचाल!


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -