घरताज्या घडामोडीHindu Population: हिंदूंची लोकसंख्या कमी झाली, तिथं समस्या निर्माण झाल्या - मोहन...

Hindu Population: हिंदूंची लोकसंख्या कमी झाली, तिथं समस्या निर्माण झाल्या – मोहन भागवत

Subscribe

जागतिक कल्याणाच्या विषयावर बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी हिंदूंच्या लोकसंख्येच्या निमित्ताने एक भाष्य केले आहे. जिथं जिथं वेगवेगळ्या कारणांमुळे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली, तिथं तिथं समस्या निर्माण झाल्या, याच कारणामुळे संघ सर्वव्यापी होऊन जागतिक कल्याणाबाबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले आहे. राजस्थानच्या उदयपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हिंदूंच्या लोकसंख्येच्या निमित्ताने विधान केले आहे. कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केलेली निस्वार्थ सेवा म्हणजे हिंदुत्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (RSS chief mohan bhagwat statement on hindu population decrease more problem occurs )

कोरोना काळात संघ स्वयंसेवकांनी केलेली निःस्वार्थ सेवा म्हणजेच हिंदुत्व आहे, असेही भागवत म्हणाले आहेत. हिंदू राष्ट्राच्या परम वैभवामुळे जगाच कल्याण होईल, असे भागवत यांनी हिंदूत्वाची व्याख्या सांगतांना म्हटले आहे. हिंदूंची लोकसंख्या कमी झालेल्या ठिकाणी समस्या निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हिंदू हे सनातन संस्कृतीला मानणारे आहेत. सनातन संस्कृतीच्या विचारसरणीमधील संस्कार हे संपूर्ण विश्वाचा विचार करण्याची शिकवण देतात. आज संघ जागतिक बंधूभाव जपण्याच्या भावनेने काम करतो. संघासाठी संपूर्ण विश्व हे समान आहे. संघाला लोकप्रियतेची हाव नाही. श्रेयवाद, लोकप्रियता संघाला नकोय. ८० च्या दशकापर्यंत हिंदू हा शब्द सार्वजनिकपणे बोलायलाही टाळले जायचे. अशा परिस्थितीत संघाने प्रवाहाविरोधात जाऊन काम करायला सुरूवात केली. सुरूवातीच्या काळात साधनांची कमतरता असतानाही संघ काम करत राहिला. आज संघ जगातील सर्वात मोठी मोठी संघना म्हणून ओळखला जातो.

- Advertisement -

”हिंदू समाजाला एकत्र आणल्यास भारताच्या सर्व समस्यांवर समाधान मिळवता येऊ शकते”, असे संघाचे संस्थापक डॉ हेगडेवार यांनी म्हटल होतं. आपण सर्वजण भारतमातेची लेकरं आहोत. हिंदूंच्या विचारसरणीत शांती आणि सत्य या दोन गोष्टींचा समावेश आहे. आपण हिंदू नाहीत अशा प्रकारची एक मोहीम देश आणि समाजाला कमकुवत बनवण्याच्या उद्देशाने राबवली जात असल्याचेही डॉ भागवत म्हणाले.

कोण काय म्हणाल ?

भागवत यांच्या वक्तव्यावर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजे एमआयएमआयएमचे असीम वकार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भागवत यांनी पूर्ण विचार करून अशी वक्तव्ये करावीत असं त्यांनी म्हटलंय. ज्याठिकाणी मुस्लिम अल्पसंख्यांक आहेत, त्याठिकाणी फार अत्याचार झाल्याचे पहायला मिळते. मग ते गुजरात असो वा महाराष्ट्र. आपल्या शेजारी असणारे दोहा, कतार, दुबई असो वा ओमान कुठेच हिंदूंवर मुस्लीम अत्याचार करताना दिसत नाही. मात्र गुजरातसोबतच अनेक ठिकाणी अत्याचाराची हद्द झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर समाजवादी पक्षाचीही यावर प्रतिक्रिया आली आहे. राकेश सिन्हा यांनी संघ प्रमुखांनी संघांची पारंपारिक विचारसरणी लक्षात घेत वक्तव्य केल्याचे म्हटलं आहे. भागवतांना धार्मिक उन्माद निर्माण करायचा आहे. ज्याठिकाणी मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे त्या लक्षद्वीप आणि काश्मिरात कोणतीही समस्या नसल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – असदुद्दीन ओवैसींच्या दिल्लीतील घरावर हल्ला, हिंदू सेनेच्या पाच जणांना अटक


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -