देशाने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात अपेक्षित प्रगती केली नाही, मोहन भागवतांचे वक्तव्य

Rss mohan bhagwat claims india is not goes in right path in 75 years

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाले परंतु अद्याप आपण अपेक्षित प्रगती केली नाही. याचे कारण आपण चुकीच्या मार्गावर चाललो असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून देशाच्या स्वातंत्र्यावर वादंग सुरु होते. देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असल्याचे काही लोकांनी सांगितले. मात्र आता आरएससचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्यांच्या वक्तव्यादरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाले असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान भागवत यांनी विकासावर भाष्य केलं आहे. देश चुकीच्या मार्गावर जात असल्यामुळे अपेक्षित प्रगती करता आली नाही यामुळे आपल्याला योग्य मार्गावर चालावे लागेल असे भागवत म्हणाले.

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, जर सर्वांनीच मनापासून काम केले तर देशाची प्रगती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. योग्य मार्गावर चालण्याची शिकवण देणाऱ्या महपुरुषांची संख्या आपल्या देशात अधिक आहे. जगामध्ये एकट्या भारतात सर्वाधिक जास्त महापुरुष मागील २०० वर्षांत झाले आहेत. त्यांनी सगळ्यांना योग्य मार्गावर निस्वार्थपणे काम करण्याची शिकवण दिली आहे. तसेच त्यांनी या मार्गावर किती संघर्ष आहे ते सुद्धा दाखवून दिले असल्यामुळे आपण योग्य मार्गावर जात नाही. यामुळेच ७५ वर्षांत भारताची जेवढी प्रगती झाली पाहिजे होती तेवढी झाली नाही. आपण योग्य मार्गावर गेलो नसल्यामुळे अपेक्षित प्रगती केली नाही.

जर देशातील सर्वच नागरिकांनी मनापासून काम केले तर देशाची प्रगती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. यासाठी प्रत्येकाला आपलाच माणूस आहे असं मानावे लागेल. भागवत पुढे म्हणाले की, सेवा आणि जनकल्याण हे काम फक्त घोषणा देऊन होत नाही. यासाठी आपल्याला तळागाळात काम करावं लागते. जर असे केले असते तर आपण ७५ वर्षांत अपेक्षित प्रगती केली असती असे मोहन भागवत म्हणाले आहेत.

लोकांनी प्रभू रामासारखे बनण्याचा प्रयत्न करावा

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे की, आपण प्रभू श्री रामांचा जोरात जयघोष करतो परंतु आपण त्यांच्या सारखे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निस्वार्थपणे सेवा करणे हीच खरी सेवा असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Parambir Singh : परमबीर सिंह भारतातच, पण मुंबई पोलिसांकडून जिवाला धोका