घरदेश-विदेशRSS देशातील प्रत्येक गावात उघडणार शाखा; मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

RSS देशातील प्रत्येक गावात उघडणार शाखा; मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Subscribe

भारतातील प्रत्येक गावात RSS ची शाखा असली पाहिजे आणि त्यातील प्रत्येक सदस्याने देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी केलं आहे. आसाम युनिटच्या कामगार शिबिराच्या समारोप समारंभात मोहन भागवत बोलत होते. यावेळी त्यांनी मतभेद असले तरी सर्वांसाठी राष्ट्र हे प्राधान्य आहे, असं प्रतिपादन केलं.

आरएसएसच्या निवेदनानुसार, भागवत यांनी म्हटले की, भारतातीस प्रत्येक गावात शाखा असली पाहिजे, कारण संपूर्ण समाजाने त्यांना (शाखेला) त्यासाठी काम करण्याची संधी दिली आहे, म्हणूनच स्वयंसेवकांनी पुढे जाऊन समाजाचे नेतृत्व केले पाहिजे. भागवत ज्या कार्यक्रमाला संबोधित करत होते त्या कार्यक्रमास केवळ आरएसएस कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी होती. यावेळी भागवत म्हणाले की, भारताचा अभिमान आणि वारसा याविषयी पूर्ण निष्ठेने स्वयंसेवकांनी देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे. तसेच देशासाठी सर्व काही करण्याची तयारी ठेवावी लागेल.

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांचे स्मरण करून ते म्हणाले की, डॉ. केशव बळीराम हेगडेवार यांनी मानव संसाधन विकसित करण्याच्या उद्देशाने 1925 मध्ये आरएसएसची स्थापना केली. आपल्या विचारात फरक असू शकतो पण मनात फरक नसावा, कमकुवत समाज राजकीय स्वातंत्र्याची फळं उपभोगत नाही.

यापूर्वी गेल्या गुरुवारी 8 डिसेंबरला नागपुरातील एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, ज्याचा भारतावर विश्वास आहे, ज्याची भारतावर श्रद्धा आहे. जो संस्कृतीच्या आत वावरण्याचा प्रयत्न करतो, जो त्याग करणाऱ्यांचे अनुसरण करतो, जो कोणाचीही पूजा करतो, कुठलाही कपडा परिधान करतो. जिथे तो जन्माला येतो, समाज बनवतो, तो हिंदू असतो.


…म्हणून त्यांना भिकेचे डोहाळे लागलेत; ‘सामना’तून चंद्रकांत पाटलांवर टीकास्र

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -