घर महाराष्ट्र आरक्षणासंदर्भात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले...

आरक्षणासंदर्भात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले…

Subscribe

नागपूर : “जातीभेद संपत नाही, तोपर्यंत संविधानात जेवढे आरक्षण आहे. तेवढच सुरूच राहवे आणि संघाचा त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे”, असे वक्तव्य आरएसएस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. अग्रवाल समाजाच्या संघटनेतर्फे चालवल्या जाणाऱ्या अग्रसेन छत्रवास येथील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. मोहन भागवत बोलले.

आरक्षणसंदर्भात मोहन भागवत म्हणाले, “आपण आपल्या काही बांधवाना समाजव्यवस्थेतून मागे ठेवले. त्यांचे जीव पशूसारखे झाले, तेव्हा आपण चिंता केली नाही, असे मागे ठेवा, त्यांचे जीव पशूसारखे होते. तेव्हा आपण काळजी केली नाही. असे जवळपास 2000 वर्ष सुरू होते. महाभारतात असे उल्लेख करतात. जन्मापासून जातपात नाही मागणली पाहिजे. तेव्हा सुरू होते. हळूहळू बिकट परिस्थिती झाली. त्यांना आपल्या बरोबर येई आणण्यासाठी काही विशेष उपाय करावे लागणार आहेत. घरात दुध कमी आले, सर्वांना दूध मिळत नाही. पण जो आजारी आहे. त्या सर्वात जास्त दूध मिळते. तेव्हा आपण बोलत नाही की, तुम्ही त्याला दूध का देता. तेव्हा आपण विचारत नाही की, त्यांना दूध का दिले जातील. कारण कुटुंबात सर्व सामान आहेत. कारण जो आजारी आहे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते, असे आरक्षण लागू केले आहे. यामुळे जोपर्यंत भेदभाव आहे. तोपर्यंत ते सुरू राहिल पाहिजे. संविधानात जे आरक्षण आहे. त्याला आम्ही संघाचे लोक पूर्णपणे पाठिंबा देतो.”

- Advertisement -

आरएसएसच्या कार्यालयात 2002पर्यंत तिरंगा फडकावण्यात येत नव्हाता, या प्रश्नावर भागवत म्हणाले, “आरएसएसने नेहमी तिरंग्याचा सन्मान केला असून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा फडकावला आहे. आरएसएस हा नेहमी तिरंग्याच्या सन्मानासाठी प्राण देण्यास देखील तयार आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – सरकार अडचणीत आले की संघ असा धावून येतो…, आरक्षणावरून काँग्रेसचे शरसंधान

अखंड भारतासंदर्भात भागवत म्हणाले…

यावेळी अखंड भारत कधी होणार, हा प्रश्न विद्यार्थ्याने विचारल्यावर भागवत म्हणाले, “अखंड भारत म्हणजे फक्त सीमा बदलणे नव्हे. तर भारतीय मानसिकता स्वीकारणे आहे. आपल्या पेक्षा वेगळा विचारसरणी असल्यामुळे देशाची फाळणी झाले, हे त्यामागचे कारण आहे. आता शेजारील अनेकांना तसे वाटू लागले आहे. एकदा त्यांनी आपली विचारसरणी स्वीकारली की, ज्यामध्ये कट्टरतेचा समावेश नसेल, त्यावेळी अखंड भारताची निर्मित होईल. यामुळे आताची पिढी वृद्ध होण्याच्या आधीच हे स्वप्न पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -