घरदेश-विदेशRSS सह मोहन भागवतांनी ट्विटरचा डीपीला लावला तिरंगा; काँग्रेसने साधला निशाणा

RSS सह मोहन भागवतांनी ट्विटरचा डीपीला लावला तिरंगा; काँग्रेसने साधला निशाणा

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशवासियांना सोशल मीडियावरील डीपीवर तिरंगा ठेवण्यासह, प्रत्येक घरात आणि ऑफिसेमध्ये तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया डीपीवर तिरंगा ठेवला. यात विरोधी पक्षांनी देखील डीपीवर तिरंग्याचा फोटो लावला.

मात्र भाजप समर्थक आरएसएस संघटना प्रमुख मोहन भागवत यांनी आपला सोशल मीडिया डीपा बदलला नाही, यानंतर आरएसएस आणि भाजपवर विरोधकांनी निशाणा साधला. अखेर टीकेनंतर मोहन भागवत यांच्यासह आरएसएस संघटनेने ट्विटरचा डीपी बदलला आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंग्याचा फोटो ठेवला आहे, तसेच हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही संघ नेत्याने केले आहे. मात्र यावर आता काँग्रेसने निशाणा साधला आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी तिरंगा मोहिमेवर निशाणा साधत म्हटले की, ज्या लोकांनी आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा विश्वासघात केला, ज्यांनी आमच्या देशाचा विश्वासघात केला, ज्यांनी आमच्या स्वातंत्र्य लढ्याला आणि भार छोडो आंदोलनाला विरोध केला, ज्यांनी इंग्रजांसाठी काम केले, ज्यांनी इंग्रजांची माफी मागितली, आज ते आपला राष्ट्रध्वज तिरंगा विकत आहेत. तिरंगा विकणारी पार्टी. रमेशने एक पोस्टरही शेअर केले आहे. त्यात लिहीले आहे- तुम्हा माहित आहे का? आरएसएसने तिरंग्याला विरोधात केला तसेच संविधानाचाही.

- Advertisement -

दरम्यान आजपासून देशभरात हर घर तिरंगा मोहीम अनोख्या पद्तीने साजरी केली जात आहे. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलींना ‘तिरंगा’ भेट दिला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या पत्नी सोनल शाहा यांनी आजपासून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला सुरुवात करताना त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावला. हर घर तिरंगा मोहिमेला एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी देशवासियांना 13 ते 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी राष्ट्रध्वज लावण्याचे आवाहन केले. या मोहिमेअंतर्गत देशवासियांनी 20 कोटींहून अधिक तिरंगा वाटप करण्यात आल्याचे सांस्कृतिक मंत्रालयाकडून सांगण्यात आले.


हेही वाचा : देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम आजपासून सुरू; जाणून घ्या राष्ट्रध्वज फडकवण्याबाबतचे महत्त्वाचे नियम


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -