घरताज्या घडामोडीCAA चा देशातील कुठल्याही नागरिकाला धोका नाही - सरसंघचालक मोहन भागवत

CAA चा देशातील कुठल्याही नागरिकाला धोका नाही – सरसंघचालक मोहन भागवत

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरात पार पडतो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयादशमी उत्सवही यंदाच्या वर्षी रेशीमबागेऐवजी महर्षी व्यास सभागृहात पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या विजयादशमीला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे. प्रमुख अतिथी म्हणून कुणालाही आमंत्रित करण्यात आलेलं नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मात्र ऑनलाईन माध्यमातून स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी राम मंदिरापासून CAA पर्यंत आणि देशातील कोरोना स्थितीपर्यंतसुद्धा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला.

CAA कायद्याला काहिंनी विरोध केला. मात्रक्ष, या कायद्यामुळे देशातील कुठल्याही नागरिकाचं नागरिकत्व धोक्यात आलेलं नाही. या कायद्याचा कोणालाही धोका नाही, असं मोहन भागवत म्हणाले. यावेळी त्यांनी राम मंदिरावर भाष्य केलं. राम जन्मभूमीचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा या निर्णयाचं स्वागत केलं.

- Advertisement -

संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी स्वयंसेवकांमध्ये दसरा मेळावा पार पडतो आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण समाज एकरुप झालेला पाहायला मिळतो आहे. सेवाभाव जो आपला समाज विसरला होता, तो पुन्हा जागृत झाला आहे. सेवा करता करता काही लोकांनी आपला जीव गमावला, त्यांना श्रद्धांजली आणि जे निस्वार्थ भावनेनं लोकांची सेवा करत आहेत त्यांचे अभिनंदन करतो,” असं मोहन भागवत म्हणाले. यावेळी २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आलं तो निर्णय संपूर्ण देशानं संयमानं स्वीकारला, असं देखील म्हटलं. या काळात चीनने आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय आपल्यासोबतच अन्य देशांशीही चीनने युद्धजन्य स्थिती निर्माण केली. पण, लडाखमध्ये भारतीय सैन्यानं चीनला प्रत्युत्तर दिलं त्यामुळं चीनला जोरदार धक्का बसला आहे. आता भारताला सगळ्याच अर्थानं चीनपेक्षा मजबूत होण्याची गरज असल्याचं मोहन भागवत म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -