घरताज्या घडामोडीRT-PCR चाचणीचा वेळ कमी होणार - ICMR

RT-PCR चाचणीचा वेळ कमी होणार – ICMR

Subscribe

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने नवीन आणि सोपी RT-PCR पद्धत कोरोना चाचणीसाठी शोधून काढली आहे. या पद्धतीमुळे चाचणीचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाचणार आहे. नव्या पद्धतीमुळे केलेल्या काही बदलांमुळे चाचणीचा कालावधी कमी होऊ शकतो, असा ICMR च्या वैज्ञानिकांचा दावा आहे. नव्या पद्धतीमध्ये व्हायरसचा जेनेटिक RNA स्वतंत्र करण्याची पद्धत वगळण्यात येणार आहे. त्यामुळेच चाचणीचा कालावधी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. सरासरी दोन तासांनी हा वेळ कमी होण्याचा अंदाज आयसीएमआरकडून वर्तवण्यात येत आहे. पण नव्या चाचणीच्या पद्धती या काही ठराविक प्रयोगशाळांमध्येच होतील, असे आयसीएमआरचे म्हणणे आहे. (RT-PCR test and cost time may reduce due to new method claims ICMT)

सध्याच्या RT-PCR चाचणी पद्धतीमध्ये RNA चाचणी दरम्यान वेगळा करणे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत आयसीएमआरच्या एपिडेमेलॉजी एण्ड कम्युनिकेबल डिजिज विभागाचे प्रमुख डॉ समीरन पंडा यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले आहे. ही चाचणी वेळखाऊ आणि खर्चिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या कामासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचीही गरज असते असेही ते म्हणाले.

- Advertisement -

संपुर्ण RT- PCR चाचणीत RNA वेगळा करणे हा अतिरिक्त टप्पा आहे. याआधीही हा टप्पा वगळण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ड्राय स्वॅबच्या सॅम्पलची बफर ट्रिटमेंट आणि ९८ डिग्री सेल्सिअसला ६ मिनिटे हिट इनअॅक्टीव्हेशन यासारखी प्रक्रियाही वगळण्याचे सूचविण्यात आले होते. संशोधकांनी पुणे आणि कोलकाता याठिकाणी स्वतंत्र अभ्यासातून ११३८ जणांवर चाचणी करून एक अभ्यास मांडला आहे. ICMR नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आणि स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन (STM) कोलकाता या दोन्ही संस्थांनी मिळून हा अभ्यास केला आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या काळात RT-PCR चाचण्यांची मागणी वाढली होती. RNA वेगळी करण्यासाठीच्या किट्सचा तुटवडाही त्या काळात निर्माण झाला होता. नव्या पद्धतीमुळे प्रोटोकॉलनुसार चाचणीसाठी लागणारा कालावधी कमी होणार आहे. संशोधनाच्या दृष्टीकोनातून RT-PCR चाचणीसाठी पर्याय सुचवण्यात येणे ही महत्वाची घडामोड आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी लागतानाच आरएनए वेगळा करण्यासाठीची उपकरणेही लागणार नाहीत. त्यामुळे योग्य चाचणीची पद्धती यासाठी निवडली जाणे गरजेचे आहे. सद्यस्थितीला सगळ्याच प्रयोगशाळा ही नवीन पद्धती अमलात आणू शकत नसल्याचेही ते म्हणाले. नव्या चाचणीमध्ये सरासरी दोन तासांनी चाचणीचा कालावधी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. नव्या पद्धतीची सेन्सिटीव्हिटी ही ७८.९ टक्के इतकी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – RTPCR चाचणी अहवाल यापुढे मिळणार Whatsapp वर, उच्च न्यायालयाचा प्रयोगशाळांना आदेश


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -