Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अनिल परबांच्या अडचणी वाढणार?, बजरंग खरमाटे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल

अनिल परबांच्या अडचणी वाढणार?, बजरंग खरमाटे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल

Related Story

- Advertisement -

राज्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. खरमाटे यांच्यासोबत त्यांचे वकील देखील ईडी कार्यालयात दाखल झाले होते. खरमाटे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. दरम्यान, खरमाटे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्याने अनिल परब यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे.

ईडीने खरमाटे यांना समन्स बजावलं होतं. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरणात खरमाटे यांना चौकशी बोलावण्यात आलं आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने खरमाटे यांच्यावर घरावर छापे टाकले होते. या कारवाई दरम्यान, काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याने ईडीने खरमाटे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी समन्स बजावलं होतं.

- Advertisement -

निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तक्रार पत्रात परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कोट्यवधींची वसुली केल्याचा आरोप केला आहे. पाटील यांच्या तक्रारीनुसार, अनिल परब यांच्या सांगण्यावरून आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगसाठी कोट्यवधी रुपयांची मोठी रक्कम गोळा करण्यात आली. अशा प्रकारे २५० ते ३०० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तक्रार १५ मे रोजी देण्यात आली होती, ज्यात असे म्हटले आहे की या रॅकेटचा मास्टरमाईंड वर्धा येथे तैनात डेप्युटी आरटीओ बजरंग खरमाटे आहे.

 

- Advertisement -