घरताज्या घडामोडीमुंबई विमानतळावर आरटीपीसीआरचे दर सर्वाधिक, महाराष्ट्राने लिहिले पत्र

मुंबई विमानतळावर आरटीपीसीआरचे दर सर्वाधिक, महाराष्ट्राने लिहिले पत्र

Subscribe

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खाजगी विमानतळावर ऑपरेटरकडून रॅपिड आरटीपीसीआरच्या चाचणीत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॅपिड आरटीपीसीआरचे सर्वाधिक दर आकारले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने रॅपिड आरटीपीसीआरमध्ये ६०० रूपयांची घट केल्याचे जाहीर केले होते. परंतु मुंबई विमानतळावर रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी ४५०० रूपये आकारले जात आहेत. मात्र, याच चाचणीची किंमत ऑपरेटरने आता ३९०० रूपये केल्याचे जाहीर केले आहे. बंगळुरू, चेन्नई आणि कोची यांसारख्या विमानतळांवरील चाचणीतील दरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

सर्व विमातळांवर चाचणीच्या दरांमध्ये समानता असली पाहीजे. मुंबई विमानतळावर रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी ४५०० रूपये दर आकारले जात आहे. आता याच चाचणीचे दर ऑपरेटरकडून ३९०० रूपये केल्याचे त्यांनी जाहीर केलंय. तसेच इतर विमानतळांवरील चाचणीच्या किंमतीत हे दर सर्वाधिक असल्याचे सांगत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांना पत्र लिहिले आहे.

- Advertisement -

अदानी समूह हे मुंबई विमानतळावर महसुली फायद्यातील ३० ते ३५ टक्के भाग घेतात. प्रत्येक चाचणीसाठी महसुलापोटीचा वाटा हा सरासरी ३० ते ३५ टक्के इतका होता. परंतु हाच महसूल कमी करण्याच्या स्थितीत नसल्याचे ऑपरेटरकडून सांगण्यात येत आहे. हे दर ताबडतोब खाली करण्यात यावेत. परंतु तुलनेत दर कमी झालेले नाहीत. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला असल्याचे पत्रात म्हटले आहे.

रॅपिड आरटीपीआर चाचणींची किंमत आणखी कमी करायची की नाही. हे पाहण्यासाठी चाचणी प्रयोगशाळा आणि इतर भागीदारांसोबत आम्ही काम करत आहोत. तसेच या सर्व गोष्टींची आम्हाला जाणीव आहे. असं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. रॅपिड आरटीपीसीआर चाचण्यांसाठी विमानतळावरील महसूल वाटा आणि टक्केवारी मागे घेण्यात यावी. असे देखील भारतीय विमानतळाच्या प्राधिकरणाने म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, आरटीपीआरच्या चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी किमान पाच ते सहा तास इतका कालावधी लागतो. त्यामुळे अनेक विमानतळांवर तक्रारी देखील समोर आल्या होत्या. तर विमानतळावर तात्काळ रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी मोठी रक्कम मोजण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी विविध ठिकाणी तक्रारीही दाखल केल्या होत्या. त्यामुळे ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची २ टक्के तपासणी आणि चाचणी अनिवार्य आहे. तसेच कोविड-१९ च्या सर्व चाचण्यांचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा: भारताचा नवा विक्रम! अरब राष्ट्रांना अन्न पुरवठा करण्यात भारताचा पहिला क्रमांक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -