Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र आमदार नसतांना विधानसभा सदस्याचा स्टिकर लावून गावभर रूबाब

आमदार नसतांना विधानसभा सदस्याचा स्टिकर लावून गावभर रूबाब

Subscribe

वाहनांवरील स्टिकर काढण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

नाशिक : आमदार नसतांनाही वाहनावर विधानसभा सदस्याचा स्टिकर लावून गावभर रूबाब करणार्‍या कार्यकर्त्यांच्या वाहनांवरील स्टिकर काढून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकारयांना निवेदनाव्दारे केली आहे.

नाशिक जिल्ह्यात विविध प्रकारे दहशत माजविण्याचे प्रकार समोर येत असताना आता नवीन प्रकार नागरिकांसमोर आला आहे. नाशिक जिल्ह्यात काही वाहनचालकांकडून आमदार असे लिहिलेले स्टिकर काचेवर लावण्यात येत आहे. प्रत्यक्षात या पदावरील व्यक्ती व वाहन यांचा परस्पर काही संबंध नसतो. काही आमदारांच्या घरातील सदस्यांनी तर काही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनांवर बेकायदेशीर पणे हे स्टिकर लावले आहे. वाहनावर एक गोलाकार स्टिकर यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आणि मध्यभागी अशोक स्तंभ असे हिरव्या रंगाचे स्टिकर गाडीच्या समोरील बाजूस चिटकवलेले दिसून येतात.

- Advertisement -

प्रशासकीय अधिका-यांवर व नागरिकांवर दबाव आणण्यासाठी तसेच पोलीस प्रशासनाच्या कारवाई पासून वाचण्यासाठी असे प्रकार मुद्दाम घडत आहे. कोणताही लोकप्रतिनिधी नसताना तसे भासविणे हा गुन्हा असून लोकप्रतिनिधी असल्याचा अभास निर्माण करून नाशिक शहर व जिल्ह्यात जनतेत दहशत माजविणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी कृष्णा काळे, डॉ संदीप चव्हाण, निखिल भागवत, सागर बेदरकर, राहुल कमानकर, संतोष भुजबळ, सुनील घुगे, प्रवीण बोराडे, अविनाश मालूनजकर, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -