Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत येणाऱ्या अफवा निराधार, रुग्णालयाकडून अधिकृत स्पष्टीकरण

विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत येणाऱ्या अफवा निराधार, रुग्णालयाकडून अधिकृत स्पष्टीकरण

Subscribe

रुग्णालयाकडून त्यांची प्रकृती सुधारण्याकरता डॉक्टर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत येणाऱ्या अफवा निराधार आहेत. याबाबत रुग्णाकडून वेळोवेळी माहिती देण्यात येईल.

पुणे – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने अफवा पसरत आहे. त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. विक्रम गोखले यांच्याबाबत येणाऱ्या निधनाच्या बातम्या निराधार आहेत, असं दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटिन जारी, समोर आली महत्त्वाची माहिती

- Advertisement -

रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, रुग्णालयातील डॉक्टरांची आज सकाळी दहा वाजता बैठक झाली. या अनुषंगाने आम्ही रुग्णालयाकडून औपचारिक माहिती देत आहोत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते व्हेंटिलेटर सर्पोटवर आहेत. रुग्णालयाकडून त्यांची प्रकृती सुधारण्याकरता डॉक्टर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत येणाऱ्या अफवा निराधार आहेत. याबाबत रुग्णाकडून वेळोवेळी माहिती देण्यात येईल.

हेही वाचा – विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त खोटे, पत्नी वृषाली गोखलेंनी दिली माहिती

- Advertisement -

दरम्यान, रुग्णालयाकडून अधिकृत स्टेटमेंट येण्याआधी विक्रम गोखले यांचे निकटवर्तीय राजेश दामले यांनीही आज माध्यमांशी संवाद साधला. राजेश दामले म्हणाले की, ‘विक्रम गोखले यांची प्रकृती गेल्या २४ तासांपासून चिंताजनक आहे. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टरांच्या उपचारांना ते साथ देत नाहीत. त्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यामुळे डॉक्टर अधिक काहीही सांगू शकत नाहीत. विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहे. अफवा पसरवत असेल तर थांबवा आणि त्यावर प्रतिबंध घाला.’

गेल्या १९ दिवसांपासून विक्रम गोखले पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल सायंकाळपासून त्यांची प्रकृती खालावली. परंतु, त्यांच्या निधनाच्या बातम्या पसरवल्या गेल्या. त्यामुळे विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनीही काल रात्री माध्यमांना प्रतिक्रिया देऊन विक्रम गोखलेंविषयी पसरण्यात आलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर, आज सकाळी राजेश दामले यांनी पत्रकार परिषद घेत विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे याकरता प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -